Australia vs Pakistan 1st Test Match: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानने आपला प्लेइंग-११ जाहीर केला आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ प्रथमच कसोटी खेळणार आहे. अलीकडेच बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर मसूदची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन पाकिस्तानी खेळाडू पदार्पण करताना दिसणार आहेत.

पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा करताना पाकिस्तान क्रिकेटने लिहिले, “आमिर जमाल आणि खुर्रम शहजाद कसोटी पदार्पण करताना दिसणार आहेत.” पाकिस्तानने एक दिवस अगोदर ११ खेळाडूंची घोषणा करणे हा रणनीतीचा भाग असल्याचे मानला जात आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियानेही प्लेइंग-११ जाहीर केली होती. पॅट कमिन्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर प्लेइंग-११ मध्ये प्रत्येकी दोन उपकर्णधार करण्यात आले आहेत. स्टीव्ह स्मिथसह ट्रॅविस हेडचीही उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर

हेही वाचा: WI vs ENG: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आंद्रे रसेलचे दमदार पुनरागमन! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन विकेट्स घेत केला विक्रम

आमिर जमाल आणि खुर्रम शेहजाद हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. पाकिस्तानच्या प्लेइंग-११ नुसार इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक सलामीला दिसणार आहेत. त्याचबरोबर शान मसूद तिसऱ्या क्रमांकावर, बाबर आझम चौथ्या क्रमांकावर, सौद शकील पाचव्या क्रमांकावर आणि सरफराज अहमद यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. शकीलशिवाय अष्टपैलू सलमान अली आगा फिरकीपटूंच्या भूमिकेत दिसणार आहे. संघात चार वेगवान गोलंदाज आहेत. अष्टपैलू फहीम अश्रफशिवाय शाहीन आफ्रिदी, आमिर जमाल आणि खुर्रम शेहजाद वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

त्याचबरोबर वॉर्नर आणि ख्वाजा यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-११ मध्ये सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे. मार्नस लाबुशेन तिसऱ्या क्रमांकावर आणि स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. ट्रॅविस हेड पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. माइल्स मार्श, अॅलेक्स कॅरी हे देखील प्लेइंग-११ मध्ये आहेत. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि हेजलवूड वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. नॅथन लायन हा स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा: AUS vs PAK: उस्मान ख्वाजाच्या बुटांवरून झाला गोंधळ, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लिहिला संदेश; आयसीसीने व्यक्त केला आक्षेप

दोन्ही संघांची प्लेइंग-११

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, मिच मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.

पाकिस्तान: इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सरफराज खान, सलमान अली आगा, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, आमिर जमाल, खुर्रम शहजाद.