Australia vs Pakistan 1st ODI Match Updates In Marathi : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २ गडी राखून पराभव केला आहे. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघ प्रथम खेळताना २०३ धावांवरच मर्यादित राहिला, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ९९ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. पाकिस्तान संघात परतलेल्या शाहीन आफ्रिदीने २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या, मात्र संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. या सामन्यात बाबर आझमही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला, त्याने अवघ्या ३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीमुळे पाकिस्तानने ७० धावांपर्यंत ४ विकेट गमावल्या होत्या आणि दरम्यान बाबर आझम ३७ धावांवर अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. नवा कर्णधार मोहम्मद रिझवानने ४४ धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने २४ धावांची तर नसीम शाहने ४० धावांची खेळी खेळून प्रभावित केले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या, ज्याने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय

२०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही खराब झाली. मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी २८ धावांच्या स्कोअरवर विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर, स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिस यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांमधील ८५ धावांच्या भागीदारीमुळे सामना यजमान ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. मात्र स्टीव्ह स्मिथ ४४ आणि इंग्लिस ४९ धावा करून बाद झाला. अखेर मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्सने ९९ चेंडू शिल्लक असताना संघाच्या विजयावर शिक्कमोर्तब केला.

ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ८ धावांची गरज

ऑस्ट्रेलिया संघाने ३१ षटकानंतर ८बाद १९८ धावा केल्या आहेत. त्यांना आता विजयासाठी ८ धावांची गरज आहे. सध्या खेळपट्टीवर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाला आठवा धक्का बसला –

२५ षटकांनंतर पाकिस्तानने पुन्हा आक्रमण केले. हसनैनने हार्डीला बाद केल्याने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा आता संपुष्टात येत आहेत. तो मागे सरकला आणि ऑफ-साइडवरील लेन्थ बॉलला स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल स्टंपवर आदळला. तत्पूर्वी स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक हुकले. त्याने ४६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४४धावा केल्या. त्याला हरिस रौफने बाद केले.

हारिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी

हारिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलंच हैराण केलं. शाहीनने इंग्लिस आणि स्मिथची जोडी तोडली. तर हारिसने एका षटकात सलग दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियावर दबाव टाकला. अशारितीने ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स गमावत २२ षटकांत १४८ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या शंभरी पार

इंग्लिस आणि स्मिथने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत धावसंख्या १५ षटकांत २ बाद १०० धावांपर्यंत पोहोचवली आहे. स्मिथने ३९ इंग्लिस ३७ धावांवर खेळत आहे.

नसीम शाहने जेक फ्रेझर-मॅकगर्कला इफान खानच्या हाती झेलबाद केले

पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने मॅट शॉर्टला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. सॅम अयुबने मॅट शॉर्टचा उत्कृष्ट झेल टिपला. त्याच्यानंतर नसीम शाहने जेक फ्रेझर-मॅकगर्कला इफान खानच्या हाती झेलबाद करत दुसरा धक्का दिला. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने ८ षटकानंतर २ बाद ५० धावा केल्या आहेत.

पाकिस्तान ऑलआऊट

मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर इरफान खानला धावबाद, झाम्पाने हॅरिस रौफला क्लीन बोल्ड केलं तर कमिन्सच्या गोलंदाजीवर नसीम शाहला स्टार्कने झेलबाद करत पाकिस्तानला ऑल आऊट केलं. पाकिस्तानने ४६.४ षटकांत २०३ धावा केल्या आहेत. नसीम शाहने उत्कृष्ट ४० धावांची खेळी करत संघाला २०० टप्पा गाठून दिला. यासह पहिल्या वनडे सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानने २०४ धावांचे लक्ष्य दिले आहे.

शाहीन शाह आफ्रिदी क्लीन बोल्ड

मिचेल स्टार्कने शाहीन शाह आफ्रीदीला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानला सातवा धक्का दिला आहे. पाकिस्तान संघ ४० षटकांनंतर ७ बाद १६९ धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर नसीम शाह आणि इरफान खान खेळत आहेत.

मार्नस लॅबुशेनने पाकिस्तानला सहावा झटका दिला –

मार्नस लॅबुशेनने पाकिस्तानला सहावा झटका दिला. त्याने मोहम्मद रिझवानला बाद केले. रिझवान ४४ धावा करून बाद झाला.

सीन ॲबॉटने सलमान आघाला केलं झेलबाद –

सीन ॲबॉटने सलमान आघाला झेलबाद केले. पाकिस्तानच्या उपकर्णधाराने मारलेला हा फटका अनावश्यक होता. आघा सलमानने त्याची विकेट फेकून दिली, त्यामुळे त्याचा संघ आणखी अडचणीत आला. पाकिस्तानचा निम्मा संघ तंबत परतला आहे

पॅट कमिन्सने पाकिस्तानला दिला चौथा धक्का –

पॅट कमिन्सने कामरान गुलामला बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. पॅट कमिन्सने कामरानला यष्टीरक्षक इंग्लिसच्या हाती झेलबाद केले. पाकिस्तान संघाने २२ षटकानंतर ४ बाद ७५ धावा केल्या आहेत. कामरान ५ धावा काढून तंबूत परतला.

या दोन खेळाडूंना मिळाली पदार्पणाची संधी

पाकिस्तान संघाच्या वतीने सैम अयुब आणि मोहम्मद इरफान खान यांना एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. सैम अयुबने यापूर्वीच पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या वर्षी जानेवारीमध्ये सैम अयुबला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत पाकिस्तानसाठी ६ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर ३२३ धावा आहेत.

मिचेल स्टार्क ठरला सहावा ऑस्ट्रेलियन खेळाडू –

मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर सैम अयुबला बाद करून मिचेल स्टार्कने मायदेशात आपली 100वी वनडे विकेट घेतली. यानंतर, त्याने पाकिस्तानचा दुसरा सलामीवीर अब्दुल्ला शफीकलाही बाद केले आणि अशा प्रकारे त्याच्या 101व्या विकेटसह मायदेशात सर्वाधिक बळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या यादीत स्टीव्ह वॉची बरोबरी केली.

मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन भूमीवर 100 वनडे विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे. ही कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा सहावा खेळाडू आहे. त्याच्या आधी, मायदेशात 100 किंवा त्याहून अधिक एकदिवसीय विकेट्स घेणारे पाच ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणजे ब्रेट ली (169 विकेट), मॅकग्रा (161 विकेट), शेन वॉर्न (136 विकेट), क्रेग मॅकडरमॉट (125 विकेट) आणि स्टीव्ह वॉ (101 विकेट) समाविष्ट आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak match updates australia vs pakistan 1st odi at the melbourne cricket ground vbm