AUS vs PAK Pakistan become first Asian team : रविवारी, १० नोव्हेंबर रोजी पर्थमध्ये तिसरा एकदिवसीय सामना जिंकून पाकिस्तानने इतिहास घडवला. तिसरा एकदिवसीय सामना पाकिस्तानने आठ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण ५० षटकेही क्रीजवर टिकू शकला नाही आणि ३१.५ षटकांत १४० धावांवर गडगडला. इतक्या कमी धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यात पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर हरिस रौफने ७ षटकांत केवळ २४ धावा देत दोन फलंदाज बाद केले. या विजयासह पाकिस्तानने २२ वर्षांनी इतिहास घडवत भारताला मागे टाकले.

ऑस्ट्रेलियाच्या १४० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीने सलग दुसऱ्या सामन्यात आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. सॅम अयुब ४२ आणि अब्दुल्ला शफिक ३७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवानने बाबर आझमच्या साथीने आपल्या संघाला २६.५ षटकांत विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. यासह पाकिस्तानने २२ वर्षांनतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया वनडे मालिका जिंकली.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’

पाकिस्तानचा २२ वर्षांनी ऐतिहासिक विजय –

याआधी पाकिस्तान संघाने २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची वनडे मालिका जिंकली होती. या संपूर्ण मालिकेत, पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खूपच कमकुवत दिसली, परिणामी कांगारू संघाला ५ वर्षात प्रथमच मायदेशात एकदिवसीय मालिका गमावण्याचे दुःख सहन करावे लागले. पाकिस्तानने ज्या प्रकारे ही मालिका जिंकली, तो एक मोठा विक्रम ठरला आहे. पाकिस्तानने भारतालाही मागे टाकले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने मायदेशात केवळ ९ मालिका गमावल्या आहेत. या काळात केवळ दोनच संघ असे आहेत, ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला मायदेशात दोनदा पराभूत करण्याचा मोठा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

पाकिस्तान भारताला मागे टाकत ठरला पहिला आशियाई संघ –

u

पहिला संघ दक्षिण आफ्रिका आहे, ज्याने २००९ आणि २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकली होती. आता अशी कामगिरी करणारा पाकिस्तान हा दुसरा संघ ठरला आहे. पाकिस्तानने २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिल्यांदा वनडे मालिका जिंकली होती. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन वनडे मालिका जिंकणारा पाकिस्तान पहिला आशियाई संघ ठरला आहे. भारत आणि श्रीलंकेसारख्या संघांनाही आतापर्यंत ही कामगिरी करता आलेली नाही. भारताने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत करत एकमेव द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली होती.

हेही वाचा – Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष

ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत करणारे संघ :

१९७५: इंग्लंड (१-०)
१९८३: न्यूझीलंड (१-०)
२००२: पाकिस्तान (२-१)
२००९: दक्षिण आफ्रिका (४-१)
२०१०: श्रीलंका (२-१)
२०१८: दक्षिण आफ्रिका (२-१)
२०१८: इंग्लंड (४-१)
२०१९: भारत (२-१)
२०२४: पाकिस्तान (२-१)*

Story img Loader