Aus W vs Pak W 3rd ODI: क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळा खेळाडूंना जागेवरच योग्य निर्णय घेता येत नाही. धावा घ्यायच्या की नाही… झेल घ्यायच्या की चौकार वाचवायचे… इ. याबाबतीत पाकिस्तानचे क्रिकेटपटू अनेकदा घोडचूकांना बळी पडले आहेत. अनेक वेळा खेळाडू झेल घेण्याच्या प्रयत्नात एकमेकांशी भिडले, धडकले आहेत. काही महत्त्वाच्या प्रसंगी परस्पर समंजसपणाच्या अभावामुळे झेलही सुटले आहेत. आता असाच काहीसा प्रकार पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाबाबत घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचा संघ एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. शनिवारी (२१ जानेवारी) उभय संघांमधील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना झाला. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानची यष्टीरक्षक मुनीबा अली ब्रेन फेड मोमेंटची शिकार झाली. खरे तर ऑस्ट्रेलियाच्या डावातील शेवटच्या षटकात जेस जोनासेनने फातिमा सनाच्या दिशेने फटका मारला. चेंडू बॅटवर नीट आला नाही आणि फटका नीट बसला नाही तो चेंडू मुनिबापर्यंत पोहोचला.

जोनासनला बाद करण्यासाठी चेंडू यष्टीरक्षकाकडे बराच वेळ होता, पण तिचा गोंधळ उडाला आणि ती कर्णधाराच्या नाराजीचा बळी पडली. मुनीबाच्या या कृत्याने पाकिस्तानी खेळाडू आश्चर्यचकित झाले, तर जोनासन खूप आनंदी दिसत होता. मुनिबाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर क्रिकेट चाहते सतत प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मिडिया युजरने कमेंट केली, “पाकिस्तानच्या महिला खेळाडू पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत.” एका युजरने तर मॅचवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले की, ‘ही मॅच फिक्स आहे की नाही?’ अशा अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

कामरान अकमलला रोल मॉडेल म्हणून सांगितले

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून यावर सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघही पुरुष संघाच्या पावलावर पाऊल टाकत आहे. आणखी एका युजरने पाकिस्तानी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलची आठवण काढली आणि त्याला मुनीबाचा आदर्श म्हटले.

हेही वाचा: Australian Open 2023: “अरे काही लाज…” भर सामन्यात झोपा काढता का म्हणत अंपायरला अ‍ॅलिसन रिस्के अमृतराजने दाखवले दिवसा तारे

ऑस्ट्रेलियाने मालिका ३-०ने जिंकली

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानवर १०१ धावांनी मात करत मालिका ३-०ने जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात बेथ मुनी (१३३) आणि मेग लॅनिंग (७२) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ३३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ ५० षटकांत ७ गडी गमावून २३५ धावाच करू शकला. यजमान संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा ८ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात १० गडी राखून पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs pak pakistani wicketkeeper was going to stump by hitting style suddenly slipped after turning round watch video avw
Show comments