David Warner Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नववर्षानिमित्त चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, २०२५मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकतो असेही वॉर्नरने म्हटले आहे. डेव्हिड वॉर्नरने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सिडनी येथे ३ जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर तो या फॉरमॅटला अलविदा करेल. आता त्याने कसोटीबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर त्याने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात घातक गोलंदाजाचे नाव उघड केले आहे.

वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीतील त्याच्या दृष्टीने सर्वात अवघड असणाऱ्या गोलंदाजाचे नाव सांगितले. तो म्हणला, “डेल स्टेन हा मला खूप घातक गोलंदाज वाटतो. त्याच्या गोलंदाजीवर फटके मारणे खूप अवघड होते.” क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना वॉर्नर म्हणाला, “निःसंशय हा डेल स्टेन हा खूप जबरदस्त गोलंदाज आहे. मी पर्थमध्ये (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१६-१७च्या मायदेशातील पहिली कसोटी) जेव्हा परतलो मला आणि शॉन मार्शला ४५ मिनिटांच्या त्या सत्रात धावा काढणे सोडा स्टेनच्या गोलंदाजीचा सामना करणे देखील अवघड वाटत होते. शॉन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘मी त्याला शॉटस् मारू शकत नाही त्यामुळे मला कळत नाही की आपण त्याची गोलंदाजी कशी खेळणार आहोत’. यावर मी देखील काहीच उत्तर देऊ शकलो नाही.”

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा

हेही वाचा: AUS vs PAK: निवृत्तीनंतर वॉर्नरचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “काही कीबोर्डच्या मागे लपतात तर काही एकत्र बिअर…”

भारताने विश्वचषक जिंकणे ही मोठी कामगिरी आहे

ऑस्ट्रेलियन सलामीवीर पुढे म्हणाला की, “यावर्षी भारतामध्ये विश्वचषक जिंकणे ही एक मोठी कामगिरी आम्ही केली आहे.” सोमवारी सिडनी क्रिकेट मैदानावर पत्रकारांशी बोलताना त्याने सांगितले, “मी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे.” वॉर्नर दोनदा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य आहे. मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली २०१५ साली तो मेलबर्नमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर मागील वर्षी २०२३मध्ये भारताविरुद्ध अंतिम सामना जिंकून विश्वचषक जिंकला. या दोन्ही वेळी डेव्हिड वॉर्नर संघाचा भाग होता.

वॉर्नरला जास्तीत जास्त लीग क्रिकेट खेळायचे आहे

वॉर्नर क्रिकेट लीग बद्दल म्हणाला की, “त्याला जगभरातील इतर लीगमध्ये खेळायचे आहे. त्याच्या निवृत्तीमुळे वन डे संघाला पुढे जाण्यास मदत होईल.” ऑस्ट्रेलियन सलामीवीर पुढे म्हणाला की, “जर तो दोन वर्षे चांगला खेळत राहिला आणि संघाला त्याची गरज असेल तर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल.”

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधणार का? अ‍ॅलन डोनाल्ड म्हणाला, “ सेंच्युरियनच्या तुलनेत येथे काम…”

ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वविजेते बनवण्यात महत्त्वाची भूमिका

वॉर्नर हा दोन वेळा विश्वचषक विजेता देखील आहे. त्यांनी २०१५ मध्ये घरच्या मैदानावर आणि २०२३ मध्ये पुन्हा भारतात विजेतेपद पटकावले. त्याने २०१५ विश्वचषकाच्या आठ डावात ४९.२८च्या सरासरीने आणि १२०.२०च्या स्ट्राईक रेटने ३४५ धावा केल्या. त्याने शतक झळकावले होते. तो या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ११ सामन्यांमध्ये ४८.६३च्या सरासरीने आणि १०८.२९च्या स्ट्राइक रेटने ५३५ धावा केल्या. तो या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने विश्वचषकात दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती.

Story img Loader