Australia vs South Africa, Cricket World Cup 2023 Semi Final: दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले असून ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर कांगारूंनी दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड मिलरचे झुंजार शतक व्यर्थ ठरले. रविवारी १९ तारखेला ऑस्ट्रेलिया टीम इंडियाशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहे. दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का पुसण्यात अपयशी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कांगारुंवर या २१३ धावा करण्यासाठी दबाव आणला होता. ऑस्ट्रेलियाची हे लक्ष्य गाठताना खूप दमछाक झाली. ऑस्ट्रेलिया ८व्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. याआधी ते १९७५, १९८७, १९९६, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ साली अंतिम फेरीत पोहचले होते.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला आणि विक्रमी आठव्यांदा एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. पाचवेळा विश्वविजेता कांगारू संघ रविवारी अहमदाबादच्या मैदानावर यजमान आणि दोन वेळचा विश्वविजेता भारताशी भिडणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्व गडी गमावून २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४७.२ षटकांत ७ गडी गमावून लक्ष्य गाठले. आफ्रिकन संघ पराभूत होऊन पाचव्यांदा विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दुसरीकडे, यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने निवृत्ती घेतली असून त्याचा हा शेवटचा सामना ठरला.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक १०१ धावा केल्या. क्लासेनने ४७ धावांची खेळी केली. कोएत्झीने १९ धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ६२ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ३० आणि डेव्हिड वॉर्नरने २९ धावांचे योगदान दिले. जोश इंग्लिसने २८ धावा केल्या. लाबुशेनने १८ धावांचे योगदान दिले. अखेरीस मिचेल स्टार्कने १६ धावांची नाबाद खेळी तर पॅट कमिन्सने १४ धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा, एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना मदत केली.

तत्पूर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय त्याच्याच संघातील फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कर्णधार बावुमा पहिल्याच षटकात खातेही न उघडता बाद झाला. मिचेल स्टार्क व जोश हेजलवूड या जोडीने दक्षिण आफ्रिकेवर दबाव टाकत धावा काढू दिल्या नाहीत. त्यामुळे डी कॉकने दबाव कमी करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो केवळ तीन धावा करून तंबूत परतला.

त्यानंतर मार्करम व रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी थोडाफार संघर्ष केला मात्र, ते देखील बाद झाले. ४ बाद २४ अशी खराब अवस्था असताना मिलर व क्लासेन या जोडीने संघाचा डाव सावरला आणि ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. क्लासेन ४७ धावा करून बाद झाला, त्याचे अर्धशतक हुकले. त्याला व जेन्सनला हेडने लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर मिलरने डावाची सूत्रे हाती घेताना आक्रमक फटकेबाजी केली. त्याने आपल्या विश्वचषक कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. तो ४८व्या षटकात बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २१२ धावांवर आटोपला.  डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना सांगितले की, अशा परिस्थितीत कशी फलंदाजी करायची असते. एका बाजूने विकेट्स पडत असताना मिलरने शानदार शतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले होते. मात्र, त्याच्या या खेळीवर दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे पाणी फिरवले गेले.

Story img Loader