दक्षिण आफ्रिका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.  कसोटी मालिकेतील दुसरा सामना सोमवारपासून (दि. २६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात कालपासून बऱ्याच लक्षवेधक घडामोडी घडत आहेत. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने शानदार द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, हा वॉर्नरचा १००वा कसोटी सामना आहे. तर तिकडे दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाज नॉर्खिया दुखापतग्रस्त झाला आहे.

मैदानात एखाद्या खेळाडूच्या पाठीमागे स्पायडर कॅम लागला आणि त्यामुळे तो त्याच्या चेहऱ्यावर पडला तर कुणालाही आश्चर्य वाटेल, पण असे प्रत्यक्षात घडलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीतही असेच काहीसे घडले. खरेतर, मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. फिल्डिंग करत असताना स्पायडर कॅमची टक्कर नोर्कियावर झाली आणि तो तोंडावर पडला. काही वेळ सहकारी खेळाडूंना काय झाले ते समजू शकले नाही.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा: AUS vs SA: १००व्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरचे द्विशतक! मात्र सेलिब्रेशन पडले महागात; सचिनच्या विक्रमाची बरोबरी

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर एनरिक नॉर्खियासोबत ही घटना घडली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४८वे षटक संपले होते. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होते. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ गडी गमावून १७६ धावा होती. यानंतर डिंक्स ब्रेक झाला आणि खेळाडू पाणी पीत होते. दरम्यान, नॉर्खिया आपल्या क्षेत्ररक्षणावर परतत होता. त्याचवेळी फॉक्स स्पोर्ट्सचा स्पायडर कॅम मागून वेगाने आला आणि त्याच्यावर धडकला.

नॉर्खिया त्याच्या जागी जात असताना मागून कॅमेरा धडकला

खरेतर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना फॉक्स स्पोर्ट्सच्या फ्लाइंग फॉक्स कॅमेरा, ज्याला स्पायडर कॅमेरा असेही म्हणतात, त्याच्या पाठीवर आदळला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर नॉर्खिया जमिनीवर पडताना दिसत आहे. या घटनेत नॉर्खिया याला दुखापत झाली नसली तरी लोक त्यावर जोरदार टीका करत आहेत. कारण कॅमेरा चुकून त्याच्या डोक्याला लागला तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. लोक असेही म्हणतात की, नॉर्खिया त्याच्या जागी परत जात होते, म्हणून त्याने काहीही चुकीचे केले नाही.

यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथलाही नॉर्खियाच्या प्रकृतीची माहिती मिळाली. तो नशीबवान होता की त्याला जास्त दुखापत झाली नाही कारण स्पायडर कॅमचा वेग खूप जास्त होता. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने दुसऱ्या दिवशी आपल्या १००व्या कसोटीत द्विशतक पूर्ण केले. २०० धावांच्या स्कोअरवर तो रिटायर्ड हर्ट झाला. खरे तर त्याचे स्नायू खूप ताणले गेले होते. या धावसंख्येवर वॉर्नर माघारी परतला. त्याआधी स्मिथ ८५ धावांची इनिंग खेळून बाद झाला. त्याला एनरिक नॉर्खियाने बाद केले.

Story img Loader