दक्षिण आफ्रिका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना सोमवारपासून (दि. २६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात कालपासून बऱ्याच लक्षवेधक घडामोडी घडत आहेत. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने शानदार द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, हा वॉर्नरचा १००वा कसोटी सामना आहे. तर तिकडे दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाज नॉर्खिया दुखापतग्रस्त झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मैदानात एखाद्या खेळाडूच्या पाठीमागे स्पायडर कॅम लागला आणि त्यामुळे तो त्याच्या चेहऱ्यावर पडला तर कुणालाही आश्चर्य वाटेल, पण असे प्रत्यक्षात घडलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीतही असेच काहीसे घडले. खरेतर, मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. फिल्डिंग करत असताना स्पायडर कॅमची टक्कर नोर्कियावर झाली आणि तो तोंडावर पडला. काही वेळ सहकारी खेळाडूंना काय झाले ते समजू शकले नाही.
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर एनरिक नॉर्खियासोबत ही घटना घडली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४८वे षटक संपले होते. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होते. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ गडी गमावून १७६ धावा होती. यानंतर डिंक्स ब्रेक झाला आणि खेळाडू पाणी पीत होते. दरम्यान, नॉर्खिया आपल्या क्षेत्ररक्षणावर परतत होता. त्याचवेळी फॉक्स स्पोर्ट्सचा स्पायडर कॅम मागून वेगाने आला आणि त्याच्यावर धडकला.
नॉर्खिया त्याच्या जागी जात असताना मागून कॅमेरा धडकला
खरेतर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना फॉक्स स्पोर्ट्सच्या फ्लाइंग फॉक्स कॅमेरा, ज्याला स्पायडर कॅमेरा असेही म्हणतात, त्याच्या पाठीवर आदळला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर नॉर्खिया जमिनीवर पडताना दिसत आहे. या घटनेत नॉर्खिया याला दुखापत झाली नसली तरी लोक त्यावर जोरदार टीका करत आहेत. कारण कॅमेरा चुकून त्याच्या डोक्याला लागला तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. लोक असेही म्हणतात की, नॉर्खिया त्याच्या जागी परत जात होते, म्हणून त्याने काहीही चुकीचे केले नाही.
यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथलाही नॉर्खियाच्या प्रकृतीची माहिती मिळाली. तो नशीबवान होता की त्याला जास्त दुखापत झाली नाही कारण स्पायडर कॅमचा वेग खूप जास्त होता. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने दुसऱ्या दिवशी आपल्या १००व्या कसोटीत द्विशतक पूर्ण केले. २०० धावांच्या स्कोअरवर तो रिटायर्ड हर्ट झाला. खरे तर त्याचे स्नायू खूप ताणले गेले होते. या धावसंख्येवर वॉर्नर माघारी परतला. त्याआधी स्मिथ ८५ धावांची इनिंग खेळून बाद झाला. त्याला एनरिक नॉर्खियाने बाद केले.