Australian Team Trolls On Social Media: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहे. या संघाने क्रिकेटच्या मैदानावर क्षेत्ररक्षणाचे नवे आयाम निर्माण केले आहेत, मात्र एकना स्टेडियममध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. वास्तविक, गुरुवारी लखनऊच्या एकना स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून ३११ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे खराब क्षेत्ररक्षण –

या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे ६ झेल सोडले. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे क्षेत्ररक्षण सोशल मीडियावर सातत्याने टॉप ट्रेंडिंग होत आहे. खरं तर, सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, ऑस्ट्रेलियन खेळाडू हातावर बटर घेऊन क्षेत्ररक्षणासाठी आले होते. त्यामुळे कांगारूंनी अनेक झेल सोडले. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स ऑस्ट्रेलियन संघाच्या क्षेत्ररक्षणावर सातत्याने कमेंट करत आहेत.

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य –

त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे, तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५० षटकात ७ विकेट गमावत ३११ धावा केल्या. अशाप्रकारे या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला प्रथमच विजयासाठी ३१२ धावा कराव्या लागतील. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने १०६ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. एडन मार्करामने ४४ चेंडूत ५६ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलने २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

डी कॉकने एकदिवसीय कारकिर्दीतील झळकावले १९वे शतक –

डी कॉकने या सामन्यात कांगारू संघाविरुद्ध ९० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ८ चौकार मारले आणि पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १९ वे शतक होते, तर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचे हे त्याचे तिसरे वनडे शतक होते. या सामन्यात डी कॉकने १०६ चेंडूत ५ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. त्याला ग्लेन बाद केले.