South Africa beat Australia by 134 runs in World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील दहावा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. या सामन्यात आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियाचा मोठ्या फरकाने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत सात गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव ४०.५ षटकांत १७७ धावांवर आटोपला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत सात गडी गमावून ३११ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने १०६ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली. त्याचबरोबर एडन मार्करामने ४४ चेंडूत ५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ ४०.५ षटकांत १७७ धावांवर गारद झाला. मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर मिचेल स्टार्कने २७ धावा केल्या. कागिसो रबाडाने तीन, तर केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
क्विंटन डी कॉक सामनावीर ठरला –
पाचवेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा या विश्वचषकातील हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात त्यांना भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकन संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात त्याने श्रीलंकेचा पराभव केला होता. क्विंटन डी कॉकला त्याच्या शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. हा त्याचा शेवटचा विश्वचषकही आहे.
हेही वाचा – AUS vs SA: स्टॉयनिसला आऊट देणे चुकीचे होते का? थर्ड अंपायरच्या निर्णयावर समालोचकांनी उपस्थित केले प्रश्न
दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही कमाल केली. कागिसो रबाडाने या डावात तीन विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि मार्को जॅन्सन यांना प्रत्येकी २ विकेट्स मिळाल्या. लुंगी एनगिडीलाही एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशेन सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७४ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. आता दक्षिण आफ्रिकेचा तिसरा सामना १७ ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. तसेच १६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेशी भिडणार आहे.