Australia vs South Africa World Cup 2023 Live Match Score in Marathi: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावून ३११ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने १०६ चेंडूंत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली. त्याचबरोबर एडन मार्करामने ४४ चेंडूत ५६ धावा केल्या.

एके काळी दक्षिण आफ्रिकेचा संघ ३५०+ धावा करेल असे वाटत होते, पण एका षटकाच्या अंतराने मार्कराम आणि क्लासेन बाद झाले. त्याचबरोबर डेथ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीने त्यांना ३२० धावांत रोखले.

India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक यांच्यात पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी झाली. बावुमा ३५ धावा करून बाद झाला. यानंतर डी कॉकने रॅसी व्हॅन डर ड्युसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. डुसेनही २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डी कॉकने झंझावाती खेळी खेळली आणि ९० चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील १९वे शतक आणि या विश्वचषकातील सलग दुसरे शतक होते. डी कॉकने श्रीलंकेविरुद्ध १०० धावांची इनिंग खेळली होती.

डी कॉकने एकदिवसीय कारकिर्दीतील झळकावले १९वे शतक –

डी कॉकने या सामन्यात कांगारू संघाविरुद्ध ९० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ८ चौकार मारले आणि पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १९ वे शतक होते, तर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धचे हे त्याचे तिसरे वनडे शतक होते. या सामन्यात डी कॉकने १०६ चेंडूत ५ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. त्याला ग्लेन बाद केले.