ICC Cricket World Cup 2023, Australia vs Sri Lanka: आज विश्वचषक २०२३च्या १४व्या सामन्यात पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना १९९६च्या चॅम्पियन श्रीलंकेशी संपन्न झाला. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विश्वचषक २०२३मधील ऑस्ट्रेलियाने आपला पहिला विजय मिळवला. या सामन्यात मार्नस लाबुशेन आणि जोश इंग्लिश यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजयानजीक नेले. या विजयाने श्रीलंकेचे गुणतालिकेत फार मोठे नुकसान झाले असून त्यांच्यासाठी सेमीफायनलची वाट बिकट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेचा संघ ४३.३ षटकात २०९ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य मिळाले होते. ऑस्ट्रेलियाने ते आव्हान १५ षटके आणि पाच गडी राखून ३५.२ षटकांत पार केले. यामुळे त्यांच्या नेट रनरेटमध्ये देखील थोडी सुधारणा होण्यास मदत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

सध्याच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ सलग तिसऱ्या सामन्यात पराभूत झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलियानेही पराभव केला आहे.

हेही वाचा: AUS vs SL, World Cup: ऑस्ट्रेलिया-श्रीलंका सामन्यादरम्यान वादळाचा तडाखा, एकाना स्टेडियममध्ये प्रेक्षक थोडक्यात बचावले; पाहा Video

लाबुशेनजोश इंग्लिश यांनी संघाला विजयानजीक आणले

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. जोश इंग्लिशने सर्वाधिक ५८ धावा केल्या. मिचेल मार्शने ५२ धावांची खेळी केली. मार्शन लाबुशेनने ४० धावा केल्या आणि इंग्लिशसोबत चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. ग्लेन मॅक्सवेल ३१ आणि मार्कस स्टॉयनिस २० धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड वॉर्नर ११ धावा करून बाद झाला. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने तीन विकेट्स घेतल्या. दुनिथ वेल्लालागे याला यश मिळाले.

चांगल्या सुरुवातीनंतर श्रीलंकेला २०९ धावाच करता आल्या

याआधी लंकन संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पाथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका ६१ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कुसल मेंडिस ७८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ २०९ धावांवर गडगडला.

हेही वाचा: AUS vs SL, World Cup: शाब्बास डेव्हिड वॉर्नर! ग्राउंड स्टाफला खेळपट्टी झाकण्यात मदत केल्याने चाहत्यांकडून होतंय कौतुक; पाहा Video

निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने २५ धावा केल्या. दासुन शनाका बाद झाल्यानंतर कर्णधार असलेल्या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारी सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला. धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार धावा करून बाद झाले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेल्लालागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महेश तिक्षणाला खातही उघडता आले नाही. दिलशान मदुशंका हा नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs sl australia gets its first win in the world cup defeats sri lanka by five wickets marsh english half century avw
Show comments