ICC Cricket World Cup 2023, Australia vs Sri Lanka: विश्वचषकाच्या १४व्या सामन्यात, पाच वेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ सोमवारी (१६ ऑक्टोबर) आमनेसामने आले. लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर पावसामुळे सामना विस्कळीत झाला. वादळामुळे सामना काही काळ थांबला होता. यावेळी स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक एका अपघातातून थोडक्यात बचावले. स्टेडियममधील जाहिरातीचे फलक अचानक खाली कोसळले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अचानक आलेल्या वादळामुळे स्टेडियममध्ये लावलेले जाहिरातीचे फलक खाली पडले. स्टेडियमच्या छतावर लावलेले फलक पडताना पाहून प्रेक्षक घाबरले. जाहिरातीचे फलक पडल्याने प्रेक्षक गॅलरीत एकच गोंधळ उडाला. चाहते त्यांच्या जागेवरून उठून पळू लागले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी लगेच धाव घेत सर्वांना समजावून सांगितले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्वांना दुसरीकडे बसण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

श्रीलंकेने २०९ धावा केल्या

ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव ४३.३ षटकांत २०९ धावांत गुंडाळला. लंकन संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पाथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका ६१ धावा करून बाद झाली. त्याच्यानंतर कुसल मेंडिस ७८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ २०९ धावांवर गडगडला.

निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित असलंकाला दुहेरी आकडा गाठता आला, त्याने २५ धावा केल्या. कर्णधार दासुन शनाका बाद झाल्यानंतर कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारी सदीरा समरविक्रमा ८ धावांवर बाद झाली. धनंजय डी सिल्वा ७ आणि लाहिरू कुमारा ४ धावा करून बाद झाले. चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेल्लालागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. महेश तिक्षणा खाते न उघडताच तंबूत परतला. तर, दिलशान मदुशंका खाते न उघडता नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले आणि ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.

हेही वाचा: AUS vs SL, World Cup: ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे श्रीलंकेची शरणागती! कांगारूंना विजयासाठी ठेवले केवळ २१० धावांचे आव्हान

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक /कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेल्लालागे, महेश तिक्षणा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs sl world cup spectators narrowly escape ekana stadium as storm hits australia sri lanka match watch the video avw
Show comments