AUS vs WI Test series, Steve Smith: डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा नवा सलामीवीर बनला आहे पण तो पहिल्याच परीक्षेत नापास झाला. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज शमर जोसेफने कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर स्मिथला बाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्मिथच्या बॅटची कड घेऊन तिसऱ्या स्लिपच्या हातात गेला. स्मिथने केवळ १२ धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १७ जानेवारीपासून सुरू झाला आहे. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव अवघ्या १८८ धावांवर आटोपला. यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघानेही पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५९ धावा होईपर्यंत २ गडी गमावले होते. यामध्ये प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळलेल्या स्टीव्ह स्मिथच्या विकेटचाही समावेश आहे.
स्मिथ केवळ १२ धावा करून पदार्पणवीराचा बळी ठरला
डेव्हिड वॉर्नरने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजासोबत डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली होती. स्मिथसाठी कसोटी क्रिकेटमधील हे पहिले आव्हान होते, त्यानंतर त्याने २६ चेंडूंचा सामना करत १२ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने २ चौकार मारले. त्यानंतर स्मिथने वेगवान गोलंदाज शमर जोसेफच्या पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली, जो वेस्ट इंडिजकडून पदार्पण कसोटी सामना खेळत होता. जोसेफच्या या चेंडूने स्मिथचा अंदाज पूर्णपणे चुकवला आणि तिसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जस्टिन ग्रीव्हजने झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही.
स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांच्यात पहिल्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. यानंतर, ४५ धावांवर, ऑस्ट्रेलियन संघाला दुसरा धक्का मार्नस लाबुशेनच्या रूपाने बसला, जो १० धावा करून जोसेफचा बळी ठरला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा उस्मान ख्वाजा नाबाद ३० आणि कॅमेरून ग्रीन ६ धावांवर नाबाद होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ अजूनही वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा १२९ धावांनी मागे आहे.
हेझलवूड आणि कमिन्ससमोर विंडीजच्या फलंदाजांनी गुडघे टेकले
वेस्ट इंडिज संघाच्या पहिल्या डावाबद्दल जर बोलायचे झाले तर फक्त कर्क मॅकेन्झी ५० धावा करू शकला, यानंतर संघासाठी दुसरी सर्वोच्च धावसंख्या ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शमर जोसेफकडून पाहायला मिळाली, ज्याने ३६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाच्या वतीने गोलंदाजांमध्ये जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. याशिवाय मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांनीही प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळविले.
स्मिथचा मुद्दा मान्य झाला– पॅट कमिन्स
स्मिथ सध्या जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना स्मिथने जवळपास ६०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कमिन्स म्हणाला, “ज्या व्यक्तीने जवळजवळ सर्व काही साध्य केले आहे. आता तो नवीन आव्हानासाठी सज्ज आहे. स्मिथ एका वेगळ्या दृष्टिकोनात दिसतो आहे. आज जरी लवकर बाद झाला असला तरी आगामी काळात देशासाठी चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे.