भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारतीय ‘अ’ संघावर १० विकेट्सने दमदार विजय मिळवला. भारताचा दुसरा डाव २७४ धावांमध्ये आटोपल्यावर विजयासाठी आवश्यक ६१ धावा ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता पूर्ण केल्या. दोन चारदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने १-० अशी खिशात टाकली आहे.
६ बाद २६७ धावांनी दिवस सुरू करताना भारतीय संघाने अवघ्या सात धावांमध्ये चार फलंदाज गमावले. गुरिंदर संधूने श्रेयस गोपाल (०), वरुण आरोन (१) आणि बाबा अपराजित (३०) या तिन्ही फलंदाजांना बाद केले. तर डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओ’किफेने शार्दूल ठाकूरला (४) बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला.
विजयासाठी आवश्यक असलेल्या ६१ धावा ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण केल्या. पहिल्या डावात दीड शतक झळकावलेला कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (नाबाद २१) आणि कर्णधार उस्मान ख्वाजा (नाबाद ४१) यांनी ६.१ षटकांमध्ये जलदगतीने धावा जमवत
संघाला मोठा विजय सहजपणे मिळवून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा