Champions Trophy 2025 Australia announce squad : : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून त्यासाठी संघांची घोषणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता या यादीत वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे नावही जोडले गेले आहे. २०२३ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आपला संघ जाहीर केला आहे. संघाचा कर्णधार म्हणून पॅट कमिन्सला कायम ठेवण्यात आले आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

कमिन्सच्या नेतृत्वाखाली आणखी जेतेपद पटकावण्याची संधी –

आता कमिन्सला त्याच्या नेतृत्वाखाली आणखी एक मोठे जेतेपद पटकावण्याची मोठी संधी असेल. मॅट शॉर्ट आणि ॲरॉन हार्डी यांचा प्रथमच आयसीसी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलियाला ब गटात ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया गटातील सर्व सामने लाहोर आणि रावळपिंडी, पाकिस्तान येथे खेळणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंका दौऱ्यातून बाहेर आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श परतले –

मात्र, कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि अष्टपैलू मिचेल मार्श हे देखील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर आहेत. मात्र, हे दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात परतले आहेत. हाच संघ गॉलमधील दुसऱ्या कसोटीनंतर तीन दिवसांनी हंबनटोटा येथे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळेल, जो २२ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी संघाचा एकमेव सराव सामना असेल.

हेही वाचा – Wankhede Stadium : मुंबईचे वानखेडे स्टेडियम एजाज पटेलच्या ‘या’ खास विक्रमाचे आहे साक्षीदार

आयसीसीच्या नियमांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व आठ देशांना स्पर्धा सुरू होण्याच्या पाच आठवड्यांपूर्वी त्यांचा प्रारंभिक १५ सदस्यीय संघ जाहीर करावा लागतो, परंतु संघांना पहिल्या सामन्याच्या एक आठवड्यापूर्वी बदल करण्याची परवानगी आहे. त्यानंतर संघात कोणतेही बदल करण्यासाठी आयसीसीची परवानगी आवश्यक असेल.

हेही वाचा – Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी ऑस्ट्रेलिया संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस आणि ॲडम झाम्पा.

Story img Loader