ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि बांगलादेशला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. बांगलादेशने ४३ षटकात ६ गडी गमवून १३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ३२ षटकं १ चेंडून बांगलादेशनं दिलेलं आव्हान पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे यंदाच्या विश्वचषक विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियन संघाला प्रमुख दावेदार मानलं जात आहे.
बांगलादेशचा डाव- बांगलादेशकडून मुर्शिदा खातुन आणि शरमीन अक्तर या दोघी सलामीला आल्या होत्या. या दोघींनी संघाला सावध सुरुवात करून दिली. मात्र संघाची धावसंख्या ३३ असताना मुर्शिदा खातुन १२ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या शर्मिन अख्तर, फरगाना होक, निगर सुलताना , रुमाना अहमद यांना चांगली कामगिरी करता आली नाही. लता मोंडलने ६३ चेंडूत ३३ धावा केल्या. तर सलमा खातुन आणि नहिदा अक्तर नाबाद राहिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव- ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. संघाची धावसंख्या २२ असतान अलिसा हीलीच्या रुपाने पहिला धक्का बसला. ती २२ चेंडूत १५ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या मेग लन्निंगला आपलं खातंही खोलता आलं नाही. तहिला मॅकग्राथ( ३), एखले गार्डनर (१३) धावा करून बाद झाले. मात्र बेथ मूनीने एक बाजू सावरत ७५ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. तिला अनाबेल सथरलँडची मोलाची साथ मिळाली. तिने ३९ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया: रेशल हेनस, अलिसा हीली, मेग लन्निंग, बेथ मूने, तहिला मॅकग्राथ, एखले गार्डनर, अनाबेल सथरलँड, जेस जॉनासेन, एलाना किंग, मेगन स्कूट, डार्सी ब्राउन
बांगलादेश: शरमीन अक्तर, मुर्शिदा खातुन, फरगाना होक, निगर सुलताना (कर्णधार), रुमाना अहमद,लता मोंडल, सलमा खातुन, रितु मोनी, नहिदा अक्तर, फहिमा खातुन, जहानारा आलम