Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 over Game: Australia vs Pakistan 1st T20I: कांगारू संघाने गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील ७ षटकांच्या पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला २९ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ षटकांत ९३ धावा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर नंतर कांगारू गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला.

पाकिस्तानी संघाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली असताना तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्यांची सुरुवात अतिशय लाजिरवाणी झाली. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला तो पावसामुळे विस्कळीत झाला, त्यामुळे सामना खूप उशिरा सुरू झाला आणि तो ७-७ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ षटकांत ४ गडी गमावून ९३ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ ७ षटकात ९ गडी गमावून केवळ ६४ धावाच करू शकला आणि त्यांना या सामन्यात २९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…

पाकिस्तानचा नवा कर्णधार मोहम्मद रिझवानच्या नेतृत्त्वाखाली ही संघ टी-२० मध्ये फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात पाकिस्तानी संघ ९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा अवघ्या १६ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. पाकिस्तानने पहिल्यांदाच एवढ्या कमी धावसंख्येवर ५ विकेट्स गमावले होते. कर्णधार मोहम्मद रिझवान खातेही उघडू शकला नाही, तर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू बाबर आझम ३ धावा करत बाद झाला.

हेही वाचा – Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल

पाकिस्तान संघाने ५ विकेट इतक्या झटपट गमावलेल्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच एका संघाने आपला निम्मा संघ केवळ १६ धावांवर गमावला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तर कहरच केला. गोलंदाजीत झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस यांची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्यात दोघांनी प्रत्येकी ३ विकेट घेतले. याशिवाय ॲडम झाम्पाने २ तर स्पेन्सर जॉन्सनलाही एक विकेट घेण्यात यश आले.

हेही वाचा – Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी, २ त्रिशतकं… गोव्याच्या फलंदाजांची रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत तर मॅक्सवेलने कहर केला. मॅक्सवेलने १९ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. तर त्याच्या जोडीला मार्कस स्टॉयनिसे ७ चेंडूत १ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने २१ धावा केल्या.