Australia Beat West Indies by 10 Wickets in 1st Test Match : ॲडलेडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने अशी कामगिरी केली, जी १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आजपर्यंत इतर कोणत्याही संघाला करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे, ज्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधील चार गोलंदाजांनी कसोटी सामन्यात २५० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. आजपर्यंत कसोटीत असे कधीच घडले नव्हते. या आकडेवारीच्या आधारे असे म्हणता येईल की ऑस्ट्रेलियाचे सध्याचे गोलंदाजी आक्रमण इतिहासातील सर्वात आक्रमक गोलंदाजी युनिट आहे.

ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा ॲडलेड कसोटीत वेस्ट इंडिजचा सामना करत होता, तेव्हा त्यांच्या इलेव्हनमध्ये असे तीन गोलंदाज होते, ज्यांनी २५० कसोटी विकेट्सचा टप्पा ओलांडला होता. पण ॲडलेड कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका गोलंदाजाने २५० कसोटी विकेट्सचा आकडा गाठला. हा गोलंदाज होता जोश हेझलवूड. हेजलवूडने या सामन्यात २४९ कसोटी विकेट्ससह प्रवेश केला होता. या सामन्यात त्याने पहिली विकेट घेताच ऑस्ट्रेलियन संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

IND vs AUS Andrew McDonald statement on Mohammed Shami
IND vs AUS : ‘मोहम्मद शमीची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का पण…’, ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचे वक्तव्य
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs NZ India lost a Test series at home after 12 years
IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका
IND vs NZ New Zealand set India a target of 359 runs
IND vs NZ : भारताला १२ वर्षांचा विजयरथ कायम राखण्याचे आव्हान, विजयासाठी न्यूझीलंडने दिले ३५९ धावांचे लक्ष्य
Yashasvi Jaiswal made history as the 1st Indian batter to score 1,000 Test runs in a calendar year before turning 23
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने गाठला नवा पल्ला! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
Western Australia Just Lose 8 Wickets for Just One Run in Domestic one day cup 6 Batters Goes on Duck vs Tasmania
VIDEO: ५२/२ ते ५३ वर ऑल आऊट, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने एका धावेच्या अंतरात गमावल्या ८ विकेट्स
Washington Sundar credit given Ashwin in IND vs NZ Pune Test Performance
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरने कोणाच्या मदतीने घेतल्या सात विकेट्स? कर्णधार किंवा प्रशिक्षकला नव्हे, ‘या’ खेळाडूला दिले श्रेय
Washington Sundar 7 wickets and 5 batters bowled records in IND vs NZ 2nd Test
Washington Sundar : त्रिफळाचीत करत ७ विकेट्स आणि खास पराक्रम

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या १२० धावांत गुंडाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ २६ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य पार करत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर १० विकेट्सनी विजय नोंदवला.

हेही वाचा – IND vs UZB : भारताने गमावला सलग दुसरा सामना, उझबेकिस्तानकडून पराभव झाल्याने बाद फेरीत पोहोचणे कठीण

पॅट कमिन्स आणि हेझलवूडने शानदार गोलंदाजी केली –

पहिल्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी ऑस्ट्रेलियासाठी शानदार गोलंदाजी केली. या दोघांच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. या सामन्यात हेझलवूडने ९ तर कमिन्सने ४ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात कमिन्सला एकही विकेट्स मिळू शकली नाही. याशिवाय मिचेल स्टार्कने २ आणि नॅथन लायननेही दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचे ५ फलंदाज दुसऱ्या डावात दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत.

हेही वाचा – IND vs GER : भारत-जर्मनी हॉकी सामन्याला महेंद्रसिंग धोनीने लावली हजेरी, VIDEO होतोय व्हायरल

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १८३ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजसाठी कर्क मॅकेन्झीने सर्वाधिक ५- धावांची खेळी साकारली, याशिवाय शमर जोसेफने ३६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २८३ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजविरुद्ध १०० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या १२० धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ २६ धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. हेडने पहिल्या डावात ११९ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे या सामन्यात ट्रॅव्हिस हेडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.