Australia first Team in the world to win the most ICC trophies: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला आहे. इंग्लंडमधील ओव्हल येथे टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव करून, ऑस्ट्रेलिया सर्व फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाने रविवारी ही ऐतिहासिक कामगिरी केली. आयसीसीच्या नऊ ट्रॉफी जिंकून ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाने प्रत्येक फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली नव्हती.

ऑस्ट्रेलियाने १९८७ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून याची सुरुवात केली होती. त्यानंतर १९९९ आणि २००३ एकदिवसीय विश्वचषक जिंकून त्यानी बॅक टू बॅक विजेतेपद मिळवले. यावेळी ऑस्ट्रेलिया अजेय बनला होता. त्यानंतर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी, २००७ एकदिवसीय विश्वचषक, २००९ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५ एकदिवसीय विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक २०२१ जिंकून ते इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर होते.

india new zealand second test cricket match from today
भारताचे मालिकेत बरोबरीचे लक्ष्य; न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून; खेळपट्टीचे स्वरूप गुलदस्त्यात
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Cameron Green ruled out of Test series against India in Border-Gavaskar Trophy 2024-25
IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू झाला बाहेर
Rohit Sharma Likely To Miss IND vs AUS One Test in Australia Border Gavaskar Trophy
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण
NZ W vs AUS W Match Highlights Australia beat New Zealand
NZ W vs AUS W : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग झाला खडतर
What is equation for Team India in reach the semi finals
Team India : भारताचे उपांत्य फेरीत पोहोचणे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून, जाणून घ्या काय आहे समीकरण?
Vaibhav Suryavanshi scores fastest hundred for India in U19
Vaibhav Suryavanshi : १३ वर्षीय फलंदाजाने केला मोठा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले वादळी शतक
IND vs BAN 2nd Test Match Updates in Marathi
IND vs BAN : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला नवा विश्वविक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

ऑस्ट्रेलिया सर्व फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ –

मात्र रविवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून ऑस्ट्रेलियाने जगातील नंबर-१ संघ बनण्याचा पराक्रम केला. आता ऑस्ट्रेलियाकडे एकूण ९ आयसीसी ट्रॉफी आहेत. ज्या ऑस्ट्रेलियाने वनडे, टी-२० आणि कसोटी, अशा क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये मिळवल्या जातात. यामध्ये ४ एकदिवसीय विश्वचषक, २ चॅम्पियन्स ट्रॉफी, १ टी-२० विश्वचषक आणि एका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा समावेश आहे.

हेही वाचा – WTC Final 2023: शुबमन गिलच्या विकेटवर रोहित शर्माने व्यक्त केली नाराजी, आयपीएलचे उदाहरण देत आयसीसीला दिला महत्त्वाचा सल्ला

रिकी पाँटिंग सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकणारा कर्णधार –

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने चार आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, मायकेल क्लार्क, अॅरॉन फिंच आणि पॅट कमिन्स यांच्याकडे प्रत्येकी एक आयसीसी ट्रॉफी आहे.

हेही वाचा – IND vs AUS Final: डब्ल्यूटीसी फायनल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस, पराभवानंतर भारताला किती कोटी मिळाले? जाणून घ्या

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.