दीपक जोशी

१९७५पासून यंदाच्या विश्वचषकापर्यंत ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात सात सामने झाले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने पाच, तर इंग्लंडने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र गेल्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियानेच वर्चस्व गाजवले असल्यामुळे मंगळवारी त्यांच्यापुढे इंग्लंडविरुद्ध विजयाचा चौकार लगावण्याची संधी असेल. १९९२ मध्ये इंग्लंडने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला शेवटचे पराभूत केले होते. त्याचप्रमाणे २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने १११ धावांनी मिळवलेला विजय हा उभय संघांमधील सामन्यांत कोणत्याही संघाने धावा राखून मिळविलेला पहिला विजय होता. त्यापूर्वीचे सर्व सहा विजय उभय संघांनी गडी राखून मिळवले आहेत. त्याशिवाय इंग्लंडचा आधारस्तंभ मानला जाणारा जो रूट ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच अपयशी ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्धच रूटची सरासरी ५०हून खाली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २३ सामन्यांत २७.८५च्या सरासरीने फक्त ५५७ धावा केल्या आहेत.

Story img Loader