IND vs AUS WC Final 2023: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला. अहमदाबादमधील प्रतिष्ठित नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑसी कर्णधार पॅट कमिन्सने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले; ५० षटकांत २४० धावा करत भारताने फारच कमी लक्ष्य दिले होते. दुसऱ्या सत्रात पीच फलंदाजीसाठी अनुकूल झाल्याने, ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना सात षटके बाकी असताना विक्रमी सहाव्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीतही अभूतपूर्व कामगिरी करत संपूर्ण विश्वचषकात पहिल्यांदाच भारताला सर्वबाद केले होते. आता भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने पहिल्यांदाच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या पराभवाविषयी खुलासा केला आहे. अश्विनने म्हटले की, ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय चकित करणारा होता, मला फसल्यासारखं झालं. ऑस्ट्रेलिया मोठ्या खेळांमध्ये प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो पण यंदा त्यांनी अंतिम सामन्यात असा निर्णय का घेतला याविषयी प्रश्न पडला होता.

आर. अश्विनने सांगितलं अहमदाबादच्या पीचचं गणित

अश्विनने त्याच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर स्पष्ट केले की, “ऑस्ट्रेलियाने मला फसवले आहे. ऑस्ट्रेलियाचा इतिहास पाहता मोठ्या फायनलमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर मी प्रार्थना करत होतो की ते नेहमीप्रमाणे फलंदाजीच निवडतील. अहमदाबादमधली माती ओडिशासारखीच होती, देशाच्या पूर्वेकडील भागातून घेतलेल्या मातीत जसा खेळ होतो तसाच अहमदाबादमध्ये झाला. म्हणजे समजा अन्य खेळपट्टीवर चेंडू गुडघ्यापर्यंत उसळी घेत असेल, तर या खेळपट्टीवर चेंडू गुडघ्याच्या खालपर्यंतच उसळतो. चेंडूला बाऊन्स जरी कमी असला तरी पीच वरील माती उसळत नाही कारण चिकणमाती ओलावा सोडत नाही तर धरून ठेवते.”

ऑस्ट्रेलियाने केली फसवणूक?

भारताच्या विश्वचषक मोहिमेच्या सुरुवातीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या भारतीय ऑफस्पिनरने पुढे सांगितले की प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयावर त्याने संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांच्याशी चर्चा केली होती त्यावेळी त्यांचे उत्तर ऐकून मी थक्क झाला होतो.

आश्विन म्हणाला की, “मिड इनिंगमध्ये खेळपट्टी विस्कळीत होत आहे की नाही हे मी तपासत होतो. मी मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांना भेटलो. मी विचारले, ‘नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे प्रथम फलंदाजी का केली नाही?’ त्यावर त्याने उत्तर दिले, ‘आम्ही खूप दिवसांपासून आयपीएल आणि द्विपक्षीय मालिका खेळलो आहोत आणि आमच्या अनुभवानुसार, लाल माती विखुरते पण काळी माती संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करायला उत्तम ठरते. लाल रंगावर दव फारसा प्रभावी ठरत नाही. काळ्या मातीची खेळपट्टी दुपारच्या वेळी चांगली टर्नर असते, परंतु रात्री, खेळपट्टी घट्ट होते आणि काँक्रीटची असल्यासारखी असते’.

“त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झालो होती आयपीएल आणि द्विपक्षीय मालिकांमुळे भारत जागतिक क्रिकेटचे मध्यवर्ती केंद्र ठरत आहे. जगभरातील खेळाडू खेळपट्टीशी परिचित आहेत.”

हे ही वाचा<< IND vs AUS: सूर्यकुमार यादवच्या पहिल्या पत्रकार परिषदेत घडला विचित्र प्रकार; नवीन कर्णधार म्हणाला, “फक्त..”

दरम्यान, २३ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात सुद्धा ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली होती. टीम इंडियाने नवा टी २० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या ८० आणि इशान किशन ५८ धावांच्या झंझावाती खेळीमुळे शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia deceived me r ashwin revels insane chat with aussie selector in mid inning why modi stadium pitch cost india defeat svs