Mahendra Singh Dhoni IPL : क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी. कॅप्टन कूल धोनीने भारताला आयसीसी टूर्नामेंटमध्ये विजय संपादन करून दिलं. त्यामुळे धोनीची यशस्वी कर्णधारांच्या यादीत नोंद करण्यात आलीय. याशिवाय धोनीच्या नेतृत्वात इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्जने चारवेळा जेतेपदाची माळ गळ्यात घातली आहे. धोनी एक यशस्वी कर्णधारच नाही, तर जगातील महान खेळाडूंमध्ये धोनीच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. फ्रॅंचायची क्रिकेट असो किंवा आंतराष्ट्रीय क्रिकेट युवा खेळाडूंना धोनीकडून नेहमीच प्रेरणा मिळते.

आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या एका विदेशी खेळाडूनेही धोनीचं कौतुक केलं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने धोनीबाबत एक खुलासा केला होता. धोनीचा रुम नेहमीच उघडा असायचा. धोनीला हुक्का प्यायला आवडतं. धोनीला थोडा हुक्का किंवा शीशा पिणे पसंत आहे. म्हणून धोनी नेहमी रुममध्ये हुक्का ठेवायचा. दरवाजा उघडा असल्याने युवा खेळाडूही नेहमी रुममध्ये असायचे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

नक्की वाचा – Video : कॉमेंट्री बॉक्समध्ये सायमन डुल यांचं वादग्रस्त वक्तव्य, हसन अली यांच्या बायकोला म्हणाले, ” तिने काही लोकांचे हृदय…”

सीएसकेसाठी धोनीच्या नेतृत्वात खेळलेल्या जॉर्ज बेलीने क्रिकेट.कॉम. एयूशी बोलताना म्हटलं होतं की, तुम्ही फक्त खेळाबाबत किंवा खेळातील वेगवेगळ्या पैलूंविषयी धोनीशी रात्रभर गप्पा मारू शकता. खेळासंबंधीत विविध लोकांबाबतही धोनीला विचारू शकता. तुम्ही धोनीसोबत गप्पा मारल्यानंतर तुमच्यातील अस्वस्थपणा निघून जाईल. धोनी खेळाडूंना नेहमीच मार्गदर्शन करत असतो. बेलीने सीएसकेसाठी एक सीजन आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्ससाठी धोनीच्या नेतृत्वात दुसरा सीजन खेळला होता.

विशेष म्हणजे धोनीच्या नेतृत्वात सुरेश रैना, रविंद्र जडेजा, रविचंद्रन आश्विनसारख्या खेळाडूंना मैदानात क्रिकेटचे धडे गिरवता आले. सॅम करनसारखे खेळाडूही धोनींच्या कॅप्टन्सीचं कौतुक करतात. धौनीने २०२२ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करत आहे. धोनीचा हा आयपीएल सीजन शेवटचा असेल, असं बोललं जात आहे. २०२३ मध्ये सीएसकेचा ३१ मार्चला पहिला सामना गुजरात टायटंस विरोधात होणार आहे.