India vs Australia 2023 3rd ODI Match Updates in Marathi : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर या मालिकेचा अंतिम सामना रंगणार आहे. या निर्णायक सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या आजच्या निर्णायक सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चेन्नईत दुपारी १.३० वाजता सामना सुरु होणार असून स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. मात्र, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाने या सामन्यात खोडा घातल्यास सामन्याला उशिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनाही निराशेचा सामना करावा लागू शकतो.
अशी आहे दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग XI
ऑस्ट्रेलिया : ट्रेविस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस,शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
भारत : शुबमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, के एल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज