अॅशेस कसोटी क्रिकेट मालिका
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
एपी, अॅडलेड
मिचेल स्टार्कच्या (४/३७) भेदक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २३६ धावांत गुंडाळला. प्रकाशझोतातील कसोटीत ५० बळी घेणारा स्टार्क हा पहिला गोलंदाज ठरला. अॅडलेड येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १ बाद ४५ धावा केल्या असून त्यांच्याकडे एकूण २८२ धावांची आघाडी आहे.
कर्णधार जो रूट (६२) आणि डेविड मलान (८०) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १३८ धावांची भागीदारी रचली. परंतु कॅमेरून ग्रीनने रूटला आणि स्टार्कने मलानला बाद केल्यावर इंग्लंडचा डाव घसरला.
First published on: 19-12-2021 at 00:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia lead ashes cricket balling ysh