WTC 2023 Final India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात रंगत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांची इनिंग घोषीत केलीय. ऑस्ट्रेलियाने ८४.३ षटकांमध्ये ८ विकेट्स गमावात २७० धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४४३ धावांची आघाडी घेतली असून भारताल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी ४४४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार आहे. अॅलेक्स कॅरीने १०५ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताचा डाव २९६ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाची त्यांच्या डावात खराब सुरुवात झाली. सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी परतले. उमेश यादवने ख्वाजाला १३ धावांवर तर मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला एका धावेवर असताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मार्नस लाबुशेनने सावध खेळी करत ४१ धावा केल्या.

पण उमेशच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला ३४ धावांवर झेलबाद केलं. ऑस्ट्रेलियाचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज ट्रेविस हेडलाही जडेजाने १८ धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर कॅमरूनलाही जडेजाने २५ धावांवर क्लीन बोल्ड केलं. पण त्यानंतर अॅलेक्स कॅरीन अप्रतिम फलंदाजी करत ६६ धावांची नाबाद खेळी केली. तर मिचेल स्टार्कने ४१ धावा केल्या.