Australia Mitchell Stark & Alyssa Healy: ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कसाठीकोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या लिलावात विक्रमी अशी २४.७५ कोटी रुपयांची बोली लावली आहे. आजवर अशा प्रकारची बोली अस्सल अष्टपैलूंसाठीच लावली जात होती मात्र स्टार्क आणि कमिन्स साठी आजच्या लघुलिलावात लावलेली बोली ही अपवादात्मक आहे. हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत आणि गरज भासल्यास चांगली फलंदाजी करू शकतात. ऑस्ट्रेलिया मिशेल स्टार्कसाठी यंदाचे आयपीएलचे वर्ष आजच्या लघुलिलावानंतर अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आकडेमोड पाहिल्यास मिशेलला मिळालेल्या रक्कमेत त्याची पत्नी ॲलिसा हिची सुद्धा वुमन्स प्रीमियर लीगमधील कमाई जोडल्यास आणि त्यातूनही कर वजा केल्यास स्टार्क कुटुंबाच्या घरी एकत्रित अत्यंत मोठी रक्कम पोहोचणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वूमन्स प्रीमिअर लीग साठी झालेल्या लिलावात युपी वॉरिवर्झ संघाने ७० लाख रुपये खर्चत ॲलिसा हिलीला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर बॅट्समन असणारी ॲलिसा दोन वनडे वर्ल्डकपविजेत्या आणि सहा ट्वेन्टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा भाग होती. ॲलिसाने ७ कसोटी, ९७ वनडे आणि १४४ ट्वेन्टी २० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिलांच्या बिग बॅश ट्वेन्टी२० स्पर्धेत ॲलिसा सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळते. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत २०१८ मध्ये ट्रेलब्लेझर्स संघाकडून खेळली होती. पॉवरप्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करण्यासाठी ॲलिसा ओळखली जाते. मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी ॲलिसा ओळखली जाते. ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्वही तिने केलं आहे.

ॲलिसाच्या सामन्यांसाठी अनेकदा मिचेल मैदानात उपस्थित असतो. मिचेलच्या सामन्यांना ॲलिसा उपस्थित राहते. लिलावात मिळणाऱ्या रक्कमेचे सुद्धा प्रथम अपडेट्स ॲलिसालाच मिळत होते असेही स्टार्कने सांगितले आहे. माझ्यासाठी ही रक्कम आश्चर्यकारक आणि तितकीच भारावून टाकणारी आहे, कदाचित मी सगळ्यांना हवा असेन किंवा माझी गरज असेल पण मी या सगळ्यासाठी कृतज्ञ आहे.” अशी प्रतिक्रिया स्टार्कने डीलवर शिक्कामोर्तब झाल्यावर दिली आहे.

हे ही वाचा<< IPL २००८ च्या लिलाव पत्रकाचा फोटो चर्चेत; धोनीसाठी सीएसकेने किती खर्च केला? यादीत शोएब अख्तरचेही नाव

अॅलिसा हिली आणि मिचेल स्टार्क यांची क्रिकेट प्रेमकहाणी वयाच्या ९व्या वर्षी सिडनीच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन संघाच्या चाचण्यांदरम्यान झालेल्या भेटीने सुरू झाली. दोन्ही नवोदित क्रिकेटपटूंमध्ये, विकेट-कीपिंग ड्रिल्सचा एकत्रित सराव करताना एक विशेष नातं तयार झालं. २०१६ मध्ये या दोघांचा विवाह पार पडला. यंदा आयपीएल व डब्ल्यूपीलमधून अॅलिसा हिली आणि मिचेल स्टार्क एकत्रितपणे किमान २५ कोटींहून अधिक कमाई करणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia mitchell stark wife alyssa healy also get huge money from wpl stark family earnings after ipl will blow your mind check svs