श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. पहिल्या डावात १३८ धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने दिवसअखेर दुसऱ्या डावात ८७ धावांची आघाडी मिळवली आहे. मात्र त्यांच्या केवळ ३ विकेट्स बाकी आहेत. लंकेने पहिल्या डावात केलेल्या २९४ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९ बाद ४३२ धावा करीत डाव घोषित केला. यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने ९ चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी केली. दिमुथ करुणारत्ने व कर्णधार माहेला जयवर्धने यांची शतकी भागीदारी फुटल्यानंतर लंकेचा डाव घसरला.

Story img Loader