India vs Australia 2023 2nd ODI Match Updates in Marathi : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १७ मार्चपासून सुरु झालीय. मुंबईच्या वानखेडे मैदानात पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ५ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. विशाषापट्टणम येथे या मालिकेचा दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा दमछाक केली. स्टार्कने चेंडूचा वेगवान मारा करून भारताच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांपुढं भारताच्या फलंदाजांची दाणादाण उडाली अन् भारताचा आख्खा संघ २६ षटकांत ११७ धावांवर गारद झाला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा