Australia successfully chased the biggest Test total against England in 75 years: अॅशेसच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी एजबॅस्टन कसोटी दोन गडी राखून जिंकून अॅशेस मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह कांगारू संघाने १८ वर्षांपूर्वी एजबॅस्टन येथे झालेल्या पराभवाचा बदला घेतला. २००५ मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियन संघ दोन धावांच्या फरकाने सामना गमावला होता. त्यांनी आता येथे दोन गडी राखून विजय मिळवून बदला घेतला.
या सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ३८६ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात २७३ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर २८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने कांगारूंना विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकला. दोघांनी नवव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद २८२ धावा करत लक्ष्य गाठले.
ऑस्ट्रेलियाने गेल्या ७५ वर्षांतील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. १९४८ पासून अॅशेस मालिकेच्या सामन्यात त्यांना एवढे मोठे लक्ष्य गाठता आले नव्हते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने लीड्समध्ये ४०४ धावा करून सामना जिंकला होता.
हेही वाचा – ZIM vs NED: सिकंदर रझाने झिम्बाब्वेसाठी रचला इतिहास, दोनच दिवसांत मोडला ‘हा’ मोठा विक्रम
अॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग –
लक्ष्य ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वर्ष
४०४ ४०४/३ लीड्स १९४८
३१५ ३१५/६ अॅडलेड १९०२
२८६ २८७/५ मेलबर्न १९२९
२८१ २८२/८ बर्मिंगहॅम २०२३
२७५ २७६/४ सिडनी १८९८
बेसबॉलची हवा निघाली –
जेव्हापासून न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाचा कोच झाला, तेव्हापासून इंग्लिश संघात नवीन प्रकारचे क्रिकेट खेळले जात आहे. त्यांना कोणत्याही परिस्थित सामन्याचा निकाल हवा असतो. ते कसोटी ड्रॉ करण्याचा विचार करत नाहीत. याशिवाय इंग्लिश फलंदाज एकदिवसीय शैलीत फलंदाजी करतात. त्यामुळे पुढच्या संघाच्या गोलंदाजांना सावरण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंडने १७ पैकी १२ कसोटी जिंकल्या होत्या, मात्र यावेळी विजय मिळवता आला नाही.
ऑस्ट्रेलियाने वेगवान क्रिकेट न खेळता पारंपारिक पद्धतीने कसोटी सामना खेळून इंग्लंजचा पराभव केला. अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने आधीच सांगितले होते की, इंग्लंडने इतर देशांच्या आक्रमणाविरुद्ध नक्कीच चांगली कामगिरी केली आहे, परंतु या सिद्धांतावर त्यांनी अद्याप ऑस्ट्रेलियाचा सामना केलेला नाही. स्मिथ योग्य ठरला. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने बेसबॉलचा धुव्वा उडवला, आता बेन स्टोक्सचा संघ कसा पुनरागमन करेल हे पाहावे लागेल.