कालचा दिवस क्रिकेटविश्वात दोन संघांसाठी अतिशय महत्वाचा ठरला. वेस्ट इंडिजच्या संघाने इंग्लंडवर मात केली, तर बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात स्टिव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलिया संघावर मात केली. आयसीसी क्रमवारीत नुकतच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलेल्या शाकीब अल हसनने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये १० विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाची घसरगुंडी उडवण्यात शाकीबचा मोठा वाटा होता. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने २० धावांनी गमावला.

या विजयानंतर बांगलादेशी संघाने आपल्या ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर खास सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बांगलादेशी जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रेहमानने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन ट्विट केला आहे.

अवश्य वाचा – सर जाडेजांवर कुरघोडी, बांगलादेशचा शाकिब अल हसन सर्वोत्तम अष्टपैलू

या ऐतिहासीक विजयाबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनीही बांगलादेशी संघाचं कौतुक केलंय.

Story img Loader