Australia Tour of India 2022 : आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची निवड झाली आहे. या दौऱ्या दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. या संघात सिंगापूरमध्ये जन्मलेला आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडचा समावेश करण्यात आला आहे. तर डेव्हिड वॉर्नला भारतीय दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे.
हेही वाचा – …म्हणून रोहित शर्मावर भडकला गौतम गंभीर; म्हणाला, “ऋषभ पंतला…”
सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर
सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात तीन टी-२० सामने खेळवण्यात येईल. २० सष्टेबर रोजी पहिला सामना मोहालीत, २५ सप्टेबर रोजी नागपूर, तर तीसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे.
टीम डेव्हिडचा समावेश ऑस्ट्रेलियन संघात समावेश
भारत दौऱ्यासाठी सिंगापूरमध्ये जन्मलेल्या टीम डेव्हिडचा समावेश करण्यात आला आहे. डेव्हिडने २०१९ आणि २०२२ मध्ये सिंगापूरसाठी १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. डेव्हिडचे आई-वडील ऑस्ट्रेलियन आहेत, पण त्याचा जन्म सिंगापूरमध्ये झाला आहे. तो दोन वर्षांचा असताना त्याचे पालक पर्थमध्ये स्थायिक झाले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने या वर्षाच्या सुरुवातीला डेव्हिडला ८.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
हेही वाचा – “म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”; सूर्यकुमार यादवचे पत्रकारांना मजेशीर उत्तर
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया टी-२० संघ
अॅरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा