ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर भारतानं लगेच पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार असून २३ नोव्हेंबरपासून पाच टी-२० सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारतीय टी-२० संघाची घोषणा केली आहे.
यात सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. तर ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकदिवसीय विश्वचषकात खेळलेल्या बहुतांशी खेळाडूंना बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. तर या पाच टी-२० मालिकेसाठी जास्तीत जास्त नवीन खेळाडूंनी संधी देण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबर दरम्यान ही मालिका खेळवली जाणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टनम येथे पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे.
असा असेल भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार असा भारतीय संघ असणार आहे. पण शेवटच्या दोन टी-२० सामन्यांसाठी श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून संघात सामील होणार आहे.