24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रस्तावित भारत दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. याआधी ठरवण्यात आलेल्या वेळापत्रकानूसार दोन्ही संघ 24 फेब्रुवारीरोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिला टी-20 सामना खेळणार होते. मात्र कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने सुरक्षाव्यवस्थेचं कारण दिल्यामुळे हा सामना विशाखापट्टणमला हलवण्यात आला आहे. याबदल्यात 27 तारखेला होणारा सामना बंगळुरुत खेळवला जाईल. क्रिकेट प्रशासकीय समितीने परवानगी दिल्यानंतर बीसीसीआयने वेळापत्रकातला बदल जाहीर केला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 2 टी-20 आणि 5 वन-डे सामने खेळणार आहे.

Story img Loader