आगामी ऑस्ट्रेलिया दौरा जगज्जेत्या भारताला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
 भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात चार कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेली तिरंगी एकदिवसीय स्पर्धा खेळणार आहे. ‘‘ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ा, वातावरण आदी गोष्टी लक्षात घेतल्यास हा दौरा आव्हानात्मक ठरणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने हा दौरा खूपच उपयुक्त होईल. या दौऱ्यात  खेळपट्टय़ांचा सखोल अभ्यास करण्याची संधी भारतीयांना मिळणार आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

Story img Loader