एपी, कॅनबरा : पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला व्हिसा देण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियन सरकारने गुरुवारी दिली. करोनाची लस न घेतल्यामुळे जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या गेल्या पर्वात खेळण्याची परवानगी मिळाली नव्हती. तसेच त्याचा व्हिसा रद्द करून त्याला ऑस्ट्रेलियातून बाहेर काढण्यात आले होते. २१ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचचा व्हिसा १४ जानेवारीला रद्द करण्यात आला होता आणि त्याने यासंदर्भात न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले. मात्र, तिथेही त्याच्या पदरी निराशा पडली. परंतु, आता ज्या नियमांच्या आधारे जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्यात आला होता, तो नियमच आता अस्तिवात नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे परकी नागरिकविषयक खात्याचे मंत्री (इमिग्रेशन मिनिस्टर) अँड्रयू जाइल्स यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३५ वर्षीय जोकोव्हिचला आता ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत सहभाग नोंदवण्याची मान्यता आहे. पुढील वर्षी ही स्पर्धा १६ ते २९ जानेवारी या कालावधीत मेलबर्न येथे होणार आहे. जोकोव्हिचने विक्रमी नऊ वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. जोकोव्हिच सध्या इटलीच्या टय़ुरिन येथे ‘एटीपी’ दौऱ्यातील अखेरची स्पर्धा खेळत आहे.