ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याला गुरूवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६७ धावांवर आटोपला. टेव्हिस हेडचे शतक आणि स्टीव्ह स्मिथ, टीम पेन, मार्नस लाबूशेन यांच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५० चा टप्पा पार केला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ खूपच दमदार खेळी करत होता. पण एका उसळत्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ झेलबाद झाला.
Video : हा विचित्र प्रकारचा बोल्ड पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू…
नक्की काय घडला प्रकार?
वॅगनर याने टाकलेल्या चेंडूच्या उसळीचा अंदाज न आल्याने स्मिथने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण हेन्री निकल्सने अफलातून झेलबाद झाला. स्टीव्ह स्मिथ २०० हून अधिक चेंडू खेळून ८५ धावांवर खेळत होता. त्यावेळी वॅगनरने एक चेंडू टाकला. तो चेंडू अपेक्षेपेक्षा अधिकच उसळला. स्टीव्ह स्मिथने चेंडू खाली राखण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागून उडला. त्यावेळी हेन्री निकल्सने हवेत उडी मारून केवळ हाताच्या बोटांमध्ये तो झेल टिपला आणि स्मिथला माघारी धाडले.
“हिंदू होता म्हणून त्याला पाकिस्तानचे क्रिकेटपटू द्यायचे त्रास”; शोएब अख्तरचा गौप्यस्फोट
पाहा हा भन्नाट झेल –
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५० पार…
दरम्यान, प्रथम गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकातच जो बर्न्सला त्रिफळाचीत केले. लाबूशेन आणि वॉर्नरने डाव सावरला. अर्धशतकाच्या समीप असताना वॉर्नर बाद झाला. त्याला वॅगनर ४१ धावांवर माघारी धाडले. स्मिथ आणि लाबूशेन यांनी डाव पुढे नेला. त्यांनी ८३ धावांची दमदार भागीदारी केली. पण त्यानंतर लाबूशेन त्रिफळाचीत झाला. मॅथ्यू वेडही (३८) लवकर बाद झाला. अखेर स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी डाव सावरला. स्मिथने दमदार अर्धशतक ठोकले तर हेडने शतक लगावले. स्मिथ ८५ धावांवर बाद झाल्यावर टीम पेनने हेडला साथ दिली. पेननेदेखील अर्धशतक ठोकले. पण आधी पेन ७९ धावांवर तर नंतर हेड ११४ धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ४६७ धावांत संपुष्टात आला.