David Warner Surpasses Brian Lara : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची ही शेवटची कसोटी मालिका आहे. यानंतर वॉर्नर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी डेव्हिड वॉर्नरचा धडाकेबाज फॉर्म पाहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झळकावले. पहिल्या डावात १६४ धावा करून वॉर्नर बाद झाला. वॉर्नरने या खेळीच्या माध्यमातून टीकाकारांची बोलती बंद केली.

शतक झळकावल्यानंतर वॉर्नरने केला इशारा –

सामन्यात शतक झळकावल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. यानंतर त्याने ओठांवर बोट ठेवून ‘शांत’राहण्याचा इशारा केला. त्यानंतर चाहते वॉर्नरचा हा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनसाठी असेल्याचा जोडत आहेत. खरे तर या मालिकेपूर्वी मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. कारण या मालिकेतील शेवटच्या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरला शानदार निरोप देण्याची तयारी करत आहे. ज्यावर मिशेल जॉन्सनने आक्षेप घेतला होता.

AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
AUS vs PAK Pat Cummins responding to Kamran Akmal mockery of the Australian team
AUS vs PAK : कामरान अकमलला ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवणे पडले महागात; पॅट कमिन्सने दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ India broke the embarrassing record of 50 years ago
IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या

सामन्याच्या चहापानाच्या वेळी डेव्हिड वॉर्नर म्हणाला टीकाकारांना गप्प करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावल्यानंतर त्याची पत्नी कॅंडिसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये कँडिसने डेव्हिड वॉर्नरचा फोटो सायलेंट इमोजीसह शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

डेव्हिड वॉर्नरने ब्रायन लाराला टाकले मागे –

डेव्हिड वॉर्नरची बॅट पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच यशस्वी ठरली आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावातही त्याचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड कायम राहिला. या सामन्यात त्याने २११ चेंडूत ४ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने १६४ धावांची शानदार खेळी केली. हे त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील २६ वे शतक आणि पाकिस्तानविरुद्धचे सहावे कसोटी शतक होते. एवढेच नाही तर या खेळीच्या जोरावर त्याने ब्रायन लाराला मागे टाकले.

हेही वाचा – IPL 2024 : गब्बर इज बॅक! आगामी आयपीएल हंगामासाठी करतोय कसून सराव, पंजाब किंग्जने शेअर केला VIDEO

वॉर्नरचे हे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्धचे दहावे शतक होते. आता त्याने पाकिस्तानविरुद्ध ७० डावांत ९ शतके झळकावणाऱ्या ब्रायन लाराला मागे टाकले, परंतु डेव्हिड वॉर्नरने केवळ ४७व्या डावात त्याचे दहावे शतक झळकावले. आता वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध एकूण सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर कुमार संगकारा १२ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर अरविंद डी सिल्वा ११ शतकासंह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – IPL 2024 : लिलावापूर्वी केकेआर संघात मोठा बदल, श्रेयस अय्यर आणि नितीश राणाला मिळाली नवी जबाबदारी

पहिल्या दिवसातील सामन्याची स्थिती –

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावून ३६४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने १६४ धावा, उस्मान ख्वाजाने ४१ धावा, ट्रॅव्हिस हेडने ४० आणि स्टीव्ह स्मिथने ३१ धावा केल्या. याशिवाय पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना आमेर जलालने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर शाहीन शाह आफ्रिदीने एक विकेट घेतली. सध्या ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि अॅलेक्स कॅरी १५ आणि १४ धावांवर नाबाद आहेत.