Australia vs South Africa, Cricket World Cup 2023 Semi Final Highlights Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी संपन्न झाला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला गेला. एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमावून २१२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून लक्ष्य गाठले. आता रविवारी ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक १०१ धावा केल्या. क्लासेनने ४७ धावांची खेळी केली. कोएत्झीने १९ धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ६२ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ३० आणि डेव्हिड वॉर्नरने २९ धावांचे योगदान दिले. जोश इंग्लिसने २८ धावा केल्या. लाबुशेनने १८ धावांचे योगदान दिले. अखेरीस मिचेल स्टार्कने १६ धावांची नाबाद खेळी तर पॅट कमिन्सने १४ धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा, एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना मदत केली.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्व गडी गमावून १२१ धावा केल्या. डेव्हिड मिलरने सर्वाधिक १०१ धावा केल्या. क्लासेनने ४७ धावांची खेळी केली. कोएत्झीने १९ धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. आता ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी २१३ धावांची गरज आहे.

डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना सांगितले की, अशा परिस्थितीत कशी फलंदाजी करायची असते. एका बाजूने विकेट्स पडत असताना मिलरने शानदार शतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले. शतक होताच तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने ११६ चेंडूत १०१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संकटात असताना मिलर संकटमोचक म्हणून संघाच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने झुंजार शतक झळकावले. त्यामुळे भारताविरुद्ध ते रविवारी सामना खेळतील का, हे येणाऱ्या काही तासात कळेल. आजपर्यंत हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर दोन वेळा आले आहेत आणि दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. यावेळी त्या पराभवाचा वचपा दक्षिण आफ्रिका काढणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Live Updates

World Cup 2023 Australia vs South Africa Semi Final Highlights Match Updates: ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका सेमी फायनल हायलाईट्स स्कोअर

22:12 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA:फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया भिडणार टीम इंडियाशी, दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव

दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले असून ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर कांगारूंनी दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड मिलरचे झुंजार शतक व्यर्थ ठरले. रविवारी १९ तारखेला ऑस्ट्रेलिया टीम इंडियाशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहे. दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का पुसण्यात अपयशी ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया २१४-७

https://twitter.com/cricketworldcup/status/1725192838231490851

21:44 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट पडली

ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट १९३ धावांवर पडली. जोश इंग्लिश ४९ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्याला जेराल्ड कोएत्झीने बोल्ड केले. आफ्रिकेला अजूनही सामना जिंकण्याची संधी आहे. आता स्टार्क आणि कमिन्स क्रीजवर आहेत.

ऑस्ट्रेलिया १९३-७

21:13 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली

ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट १७० धावांवर पडली. स्टीव्ह स्मिथ ६२ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. गेराल्ड कोएत्झीने त्याला क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. आता दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलिया १७५-६

21:12 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १७० धावांच्या पार

ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने पाच विकेट गमावून १७० धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिश यांनी डावाची धुरा सांभाळली आहे. हे दोघेही आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील.

ऑस्ट्रेलिया १७१-५

20:36 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट पडली

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १३७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. तबरेझ शम्सीने ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. मॅक्सवेलने पाच चेंडूत एक धाव घेतली. आता जोस इंग्लिस स्टीव्ह स्मिथसोबत क्रीजवर आहे. २५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १४१/५आहे. ऑस्ट्रेलिया १४६-५

20:35 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट पडली

ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट १३३ धावांवर पडली. तबरेझ शम्सीने मार्नस लाबुशेनला बाद केले. लाबुशेनने ३१ चेंडूत १८ धावा केल्या. शम्सीने त्याला स्टंपसमोर पायचीत केले. आता ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत येऊ शकतो.

ऑस्ट्रेलिया १३३-४

19:55 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली

ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट १०७ धावांवर पडली. ट्रॅव्हिस हेड ४८ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. केशव महाराजांनी त्याला क्लीन बोल्ड केले. आता स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन क्रीजवर आहेत. १५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १०९/३ आहे.

ऑस्ट्रेलिया ११३-३

19:30 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलिया दुसरा धक्का, मिचेल मार्श बाद

ऑस्ट्रेलियन संघाची दुसरी विकेट ६१ धावांवर पडली. मिचेल मार्श खाते न उघडताच बाद झाला. कागिसो रबाडाच्या चेंडूवर डुसेनने अप्रतिम झेल घेतला. आता स्टीव्ह स्मिथ ट्रॅव्हिस हेडसह क्रीजवर आहे. नऊ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ६८/२ आहे.

ऑस्ट्रेलिया ६८-२

19:19 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर बाद

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाने समोर ठेवलेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी शानदार सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील अर्धशतकी तोडण्यात एडन मार्करमला यश आले आहे. वॉर्नर १८ चेंडूत २९ धावा करून त्रिफळाचीत झाला आहे.

ऑस्ट्रेलिया ६०-१

18:26 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ठेवले २१३ धावांचे आव्हान

डेव्हिड मिलरच्या शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर २१३ धावांचे आव्हान ठेवले आहे. त्याने ११६ चेंडूत १०१ धावा करत संघाचा डाव सावरला. दक्षिण आफ्रिका संकटात असताना मिलर संकटमोचक म्हणून संघाच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने झुंजार शतक झळकावले. त्यामुळे भारताविरुद्ध ते रविवारी सामना खेळतील का, हे येणाऱ्या काही तासात कळेल.

दक्षिण आफ्रिका सर्वबाद २१२

https://twitter.com/ProteasMenCSA/status/1725134065647452610

18:12 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: डेव्हिड मिलरचे झुंजार शतक, कमिन्सने केले त्याला बाद

डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना सांगितले की, अशा परिस्थितीत कशी फलंदाजी करायची असते. एका बाजूने विकेट्स पडत असताना मिलरने शानदार शतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले. शतक होताच तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने ११६ चेंडूत १०१ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका २०३-९

https://twitter.com/ProteasMenCSA/status/1725130244753903660

18:02 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का, केशव महाराज बाद

दक्षिण आफ्रिकन संघांचे विकेट्स पडण्याचे सत्र सुरूच आहे. केशव महाराजने खराब फटका खेळून संघाला अडचणीत आणले आहे. त्याने ८ चेंडूत २ धावा केल्या असून तो स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केले. डेव्हिड मिलर त्याच्या शतकानजीक पोहचला असून अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे.

दक्षिण आफ्रिका १९१-८

17:52 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का, जेराल्ड कोएत्झी बाद

डेव्हिड मिलर आणि जेराल्ड कोएत्झी यांच्यातील अर्धशतकी भागीदारी तोडण्यात पॅट कमिन्सला यश आले. त्यांच्यात ७५ चेंडूत ५३ धावांची भागीदारी झाली होती. कोएत्झीने ३९ चेंडूत १९ धावा करून यष्टीरक्षक जोश इंग्लिशकरवी झेलबाद झाला. दुसऱ्या बाजूने मिलर शतकाजवळ पोहचला आहे.

दक्षिण आफ्रिका १८८-७

17:35 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १५० धावांच्या पार

दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येने सहा गडी गमावून १५० धावा केल्या आहेत. जेराल्ड कोएत्झी आणि डेव्हिड मिलर यांची चांगली भागीदारी आहे. आता दक्षिण आफ्रिकेला २०० हून अधिक धावा करण्याची संधी आहे. मात्र, यासाठी मिलरला मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका १६३-६

17:07 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: डेव्हिड मिलरचे अर्धशतक

डेव्हिड मिलरने आपले अर्धशतक ७० चेंडूत पूर्ण केले आहे. त्याच्या या लढाऊ खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या सहा विकेट्सवर १२० धावांच्या पुढे गेली आहे. आता त्याचा प्रयत्न तळाच्या फलंदाजांसह सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा असेल.

दक्षिण आफ्रिका १२७-६

https://twitter.com/ProteasMenCSA/status/1725115574798123237

17:06 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेने सहा विकेट्स गमावल्या

दक्षिण आफ्रिकेने ११९ धावांवर सहा विकेट्स गमावल्या आहेत. मार्को जॅनसेन खाते न उघडताच बाद झाला. पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. आता जेराल्ड कोएत्झी डेव्हिड मिलरसोबत क्रीजवर आहे.

दक्षिण आफ्रिका ११९-६

17:04 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ ११९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. ट्रॅव्हिस हेडने हेनरिक क्लासेनला बाद करून ही भागीदारी तोडली. क्लासेनने ४८ चेंडूत ४७ धावा केल्या. हेडने त्याला बोल्ड केले.

दक्षिण आफ्रिका ११९-५

16:35 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: मिलर-क्लासेनची अर्धशतकी भागीदारी

दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येने चार विकेट्स गमावून ६० धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलर आणि क्लासेन यांच्यात चांगली अर्धशतकी भागीदारी झाली आहे. या जोडीला मोठी भागीदारी करून आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याची गरज आहे.

दक्षिण आफ्रिका ८१-४

16:05 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: कोलकात्यात पाऊस थांबला, सामन्याला पुन्हा सुरूवात

कोलकात्यात पाऊस थांबला आणि खेळ सुरू झाला. मिलर आणि क्लासेन ही जोडी क्रीजवर आहे. दोघांनाही मोठी भागीदारी करून आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची इच्छा आहे.

दक्षिण आफ्रिका ५५-४

15:45 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: पावसामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या अडची वाढण्याची शक्यता

सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा वर्ल्ड कपचा दुसरा सेमीफायनल सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. सामना थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने १४ षटकानंतर ४ बाद ४४ धावा केल्या होत्या. जरी सध्या ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत असली, तरी पाऊस ऑस्ट्रेलियासाठी अडचणी निर्माण करू शकतो. जर सामना रद्द करावा लागला, तर कांगारू संघ गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या खाली असल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडेल.

15:22 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: १४ षटकानंतर पावसामुळे थांवण्यात आला खेळ

१४ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून आता पावसामुळे खेळ थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ४ विकेट गमावून ४४ धावा. पाऊस खूप हलका आहे. लवकरच सामना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/SocialMaaz/status/1725089013965697042

15:06 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: एडन मार्करामपाठोपाठ रॅसी व्हॅन डर डुसेन बाद

रॅसी व्हॅन डर डुसेन ३१ चेंडूत सहा धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. आता हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर क्रीजवर आहेत. या दोघांना मोठी भागीदारी करत संघाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. १२ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २४/४ आहे.

दक्षिण आफ्रिका ३२-४

15:00 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, एडन मार्कराम बाद

दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट २२ धावांवर पडली. एडन मार्कराम २० चेंडूत १० धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले. पॉइंटच्या त्याने सूर मारत शानदार झेल घेतला.

दक्षिण आफ्रिका २२-३

14:33 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, क्विंटन डी कॉक बाद

सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात झाली आहे. कर्णधार टेम्बा बावुमा पाठोपाठ क्विंटन डी कॉक बाद झाला आहे. जोश हेझलवूडने त्याला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. त्याने १४ चेंडूत केवळ ३ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिका ८-२

14:14 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: कोलकात्यामध्ये ढगाळ स्थिती

कोलकात्यामध्ये सध्या आकाश ढगाळ आहे. पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाऊ शकतो. त्याचवेळी, आज सामना होऊ शकला नाही, तर उद्या रिझर्व्ह डेच्या दिवशी सामना जिथे संपला त्याच ठिकाणाहून सुरू होईल.

दक्षिण आफ्रिका ४-१

14:13 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, टेम्बा बावुमा बाद

पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला. मिचेल स्टार्कने कर्णधार टेम्बा बावुमाला यष्टिरक्षक जोश इंग्लिसकडे झेलबाद केले. बावुमा यांना खातेही उघडता आले नाही. एका षटकानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या एका विकेटवर एक धाव आहे. सध्या क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन क्रीजवर आहेत.

दक्षिण आफ्रिका ४-१

14:02 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दोन्ही संघांची प्लेईंग-११

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

https://twitter.com/ProteasMenCSA/status/1725062767168655776

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेजलवुड.

https://twitter.com/CricWick/status/1725064531649626365

13:59 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दोन्ही संघांच्या प्लेईंग-११मध्ये केला बदल

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बावुमाने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी तबरेज शम्सीचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अ‍ॅबॉट यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.

13:38 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेईंग-११मध्ये बदल केला आहे.

https://twitter.com/harris00071/status/1725063026712494573

12:34 (IST) 16 Nov 2023
AUS vs SA: ईडन गार्डन्समध्ये हवामान कसे असेल?

वास्तविक, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा दुसरा उपांत्य सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गुरुवारी कोलकात्यात पावसाची ५० टक्के शक्यता आहे. तापमान २३ ते २६ अंशांच्या दरम्यान राहू शकते. अशा परिस्थितीत जर पाऊस पडला तर काळजी करण्याची गरज नाही, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

World Cup 2023 Australia vs South Africa Semi Final Highlights Match Updates: ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका सेमी फायनल हायलाईट्स स्कोअर

ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव करत त्यांच्या विश्वचषक विजयावर पाणी फिरवले.