Australia vs South Africa, Cricket World Cup 2023 Semi Final Highlights Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी संपन्न झाला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला गेला. एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमावून २१२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून लक्ष्य गाठले. आता रविवारी ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक १०१ धावा केल्या. क्लासेनने ४७ धावांची खेळी केली. कोएत्झीने १९ धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ६२ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ३० आणि डेव्हिड वॉर्नरने २९ धावांचे योगदान दिले. जोश इंग्लिसने २८ धावा केल्या. लाबुशेनने १८ धावांचे योगदान दिले. अखेरीस मिचेल स्टार्कने १६ धावांची नाबाद खेळी तर पॅट कमिन्सने १४ धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा, एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना मदत केली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत सर्व गडी गमावून १२१ धावा केल्या. डेव्हिड मिलरने सर्वाधिक १०१ धावा केल्या. क्लासेनने ४७ धावांची खेळी केली. कोएत्झीने १९ धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. आता ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी २१३ धावांची गरज आहे.
डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना सांगितले की, अशा परिस्थितीत कशी फलंदाजी करायची असते. एका बाजूने विकेट्स पडत असताना मिलरने शानदार शतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले. शतक होताच तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने ११६ चेंडूत १०१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संकटात असताना मिलर संकटमोचक म्हणून संघाच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने झुंजार शतक झळकावले. त्यामुळे भारताविरुद्ध ते रविवारी सामना खेळतील का, हे येणाऱ्या काही तासात कळेल. आजपर्यंत हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर दोन वेळा आले आहेत आणि दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. यावेळी त्या पराभवाचा वचपा दक्षिण आफ्रिका काढणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
World Cup 2023 Australia vs South Africa Semi Final Highlights Match Updates: ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका सेमी फायनल हायलाईट्स स्कोअर
कोलकात्याच्या ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. खेळपट्टीवरील उसळीमुळे चेंडू फलंदाजांच्या बॅटवर सहज येतो. अशा स्थितीत ईडन गार्डन्सची खेळपट्टी गोलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिली आहे.
मात्र, फलंदाजीत या मैदानावर बरेच चौकार आणि षटकार मारले जातात. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा उपांत्य सामना हा हाय स्कोअरिंग सामना असेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. मात्र, नव्या चेंडूमुळे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडीफार मदत नक्कीच मिळते.
या मैदानावर नाणेफेकीनंतरच्या निर्णयाबद्दल जर बोलायचे झाले तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होते. याशिवाय दवाचा प्रभावही दिसून येत असल्याने गोलंदाजांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला दुसऱ्या डावात फलंदाजी करायला आवडेल.
या विश्वचषकात क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यष्टिरक्षक फलंदाजाने ९ सामन्यात ६५ पेक्षा जास्त सरासरीने ५९१ धावा केल्या आहेत, विराटनंतर तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या आहेत, त्याने ९ सामन्यात ५५ पेक्षा जास्त सरासरीने ४९९ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेसाठी जेराल्ड कोएत्झीने आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, त्याने ९ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकोनॉमी ही ६.४० आहे. अॅडम झाम्पाने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, त्याने ९ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत.
विश्वचषक गटातील गट टप्पा संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे प्रत्येकी १४ गुण होते. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सकडून पराभव झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला होता, त्याशिवाय संघाने सर्व सामने जिंकले होते.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची सुरुवात पराभवाने झाली. पहिल्या सामन्यात भारताकडून आणि दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर संघाने मागे वळून पाहिले नाही आणि सलग ७ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले. ऑस्ट्रेलिया हा मोठा सामना खेळणारा संघ आहे, त्यामुळे साहजिकच या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, पण यावेळी उपांत्य फेरीचे दडपण वेगळे असेल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये १०५ सामने झाले आहेत, येथे आम्ही फक्त त्या सामन्यांबद्दल बोलत आहोत ज्यांचे निकाल मिळाले आहेत. १०५ मध्ये टाय किंवा अनिर्णीत झालेले सामने समाविष्ट नाहीत. दक्षिण आफ्रिकेने ५५ सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने ५० सामने जिंकले आहेत.
जरी आपण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या शेवटच्या १० एकदिवसीय सामन्यांबद्दल बोललो तरी, त्यात दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा दिसतो. ऑस्ट्रेलियाने केवळ २ सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने ८ सामने जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक चाहत्याला ‘चोकर्स’ या शब्दाचा राग येतो त्यामुळे हा शिक्का ते पुसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, मोठे सामने जिंकण्याची सवय असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला हरवायला आवडेल.
?? ? ❓
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 15, 2023
Who will India face in the #CWC23 Final? pic.twitter.com/HGiDzKcXCH
क्रिकेट विश्वचषक २०२३चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलिया पाच वेळा चॅम्पियन आहे, तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका जिंकल्यास विश्वचषक इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करेल.
Rivalries resume as two fabled foes clash for a spot in the #CWC23 Final ?#SAvAUS pic.twitter.com/EN3uZzqK1H
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 16, 2023

ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव करत त्यांच्या विश्वचषक विजयावर पाणी फिरवले.