लखनऊ : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयाच्या शोधात असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ सोमवारी लखनऊ येथे आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी सुरुवातीचे दोन सामने गमावले असून त्यांचा विजयी लय मिळवण्याचा प्रयत्न असेल. विशेषत: ऑस्ट्रेलियाचा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाला अनुक्रमे भारत आणि दक्षिण आफ्रिका, तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाकडून फारशा अपेक्षा बाळगल्या जात नसल्या, तरी ऑस्ट्रेलियाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

हेही वाचा >>> ENG vs AFG, WC 2023: इंग्लंडवरील थरारक विजयानंतर रवी शास्त्रींनी अफगाणिस्तानचे केले कौतुक; म्हणाले, “विश्वचषक इतिहासात…”

ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेतील त्यांची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. ऑस्ट्रेलियाची निव्वळ धावगती -१.८४६ अशी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत निराशा केली आहे. दोन सामन्यांत मिळून त्यांनी सहा झेल सोडले आहेत. फलंदाजीत झटपट गडी गमावल्याने ऑस्ट्रेलियन संघ दोनही सामन्यांत अडचणीत सापडला, तर गोलंदाजांना भारताविरुद्धची सुरुवातीची षटके सोडता लय सापडलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्वच विभागांत आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाला उर्वरित स्पर्धेत कर्णधार दसून शनाकाविनाच खेळावे लागणार आहे. मांडीच्या दुखापतीमुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत कुसाल मेंडिस श्रीलंकेचे नेतृत्व करेल.

श्रीलंका

* श्रीलंकेच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार कुसाल मेंडिसवर असणार आहे. मेंडिस लयीत असून त्याने आफ्रिकेविरुद्ध ७६, तर पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांची खेळी केली होती. 

* गेल्या सामन्यात मेंडिसला सदीरा समरविक्रमाने उत्तम साथ दिली होती. त्यानेही शतक केले होते. मात्र चरिथ असलंका आणि धनंजय डिसिल्वा यांनी कामगिरी सुधारणे आवश्यक आहे.

* गेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ३४४ धावा करूनही श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्या सर्वच गोलंदाजांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. थीकसाना आणि पथिराना यांच्या अपयशाचा श्रीलंकेला फटका बसतो आहे.

ऑस्ट्रेलिया

* ऑस्ट्रेलियाने गेल्या आठपैकी सात एकदिवसीय सामन्यांत हार पत्करली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर कामगिरी उंचावण्यासाठी दडपण असेल.

* मार्नस लबूशेनचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज धावांसाठी झगडत आहेत. अशा वेळी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची कामगिरी निर्णायक ठरू शकेल. वॉर्नरने सलामीच्या लढतीत चांगली सुरुवात करताना ४१ धावा केल्या होत्या. मात्र त्याचा आता मोठय़ा खेळीचा प्रयत्न असेल.

* लखनऊच्या खेळपट्टीकडून लेग-स्पिनर अ‍ॅडम झॅम्पा आणि ऑफ-स्पिनर ग्लेन मॅक्सवेल यांना मदत मिळू शकेल. तसेच कर्णधार कमिन्स, स्टार्क आणि हेझलवूडची भूमिकाही महत्त्वाची असेल.

* वेळ : दुपारी २ वा.   * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप