इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुक (९६) व बेन स्टोक्स (८७) यांनी प्रयत्यांची शर्थ करत फॉलोऑन वाचवण्याचा प्रयत्न केला खरा, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत त्यावर पाणी फेरले आणि अॅशेस कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३६२ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ५६६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३१२ धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी करत तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद १०८ धावांची मजल मारली.
४ बाद ८५ अशा दयनीय अवस्थेतून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडच्या मदतीला कुक – स्टोक्स जोडी धावली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला, मात्र मार्शने स्टोक्स आणि कुकला त्रिफळाचीत करून ऑस्ट्रलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. हे दोघेही बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव ३१२ धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने २५४ धावांची आघाडी घेतली आणि दिवसअेखर त्यात बिनबाद १०८ धावांची भर घालत ३६२ धावांची आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव): ५६६ (डाव घोषित)
इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद ३१२ (अॅलेस्टर कुक ९६, बेन स्टोक ८७, ; जॉन्सन ३/५३, मार्श २/२३, हेझलवूड ३/६८)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : १०८ (ख्रिस रॉजर्स खेळत आहे ४४, डेव्हिड वॉर्नर खेळत आहे ६०).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा