WTC 2023 Final India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ४४४ धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेवटच्या दिवशी स्कॉट बोलॅंडने एकाच षटकात विराट कोहली आणि रवींद्र जडेजाला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेनं नेलं. कांगारु गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं भारताचा संपूर्ण डाव ६३.३ षटकात २३४ धावांवर आटोपला. भारताला सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये विजयी झेंडा फडकवला. त्यामुळे आयसीसीच्या या टूर्नामेंटमध्ये भारताचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.

भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने (४३), शुबमन गिल (१८), चेतेश्वर पुजारा (२७), विराट कोहली (४९), अजिंक्य रहाणे (४६), रवींद्र जडेजा (०), श्रीकर भरत (२३), शार्दूल ठाकूर (०), उमेश यादव (१), मोहम्मद शमी (१३) आणि मोहम्मद सिराजने फक्त एक धाव केली. ऑस्ट्रेलियासाठी स्कॉट बोलॅंडने अप्रतिम गोलंदाजी करून ३ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने २ विकेट घेतल्या. तर नेथन लायनला ४ विकेट्स घेण्यात यश आलं. पण कर्णधार पॅट कमिन्सला या इनिंगमध्ये एका विकेटवर समाधान मानावं लागलं.