ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला असून वेस्टइंडिला १५७ धावांनी पराभूत केलं. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मात्र हा निर्णय चुकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ गडी गमवून ३०५ धाव केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १४८ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने १९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५ आणि २०१३ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. नवव्यांदा ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीतपर्यंतच्या प्रवासात ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही.
ऑस्ट्रेलियाचा डाव
रेशल हेनस आणि अलिसा हीली या जोडीनं ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी २१६ धावांची भागीदारी केली. हिली १२७ धावा करून बाद झाली. त्यानंतर लगेचच रेशल हेनस ८५ धावांवर असताना तंबूत परतली. चिनले हेन्रीच्या गोलंदाजीवर डिएन्ड्रा डोट्टीने झेल घेतला. तर एखले गार्डनर १२ धावांवर असताना बाद झाली. मात्र त्यानंतर मेग लन्निंग आणि बेथ मूने या जोडीनं संघाच्या ३०० च्या पार धावा नेल्या आणि वेस्ट इंडिजसमोर ३०५ धावांचं आव्हान ठेवलं.
ऑस्ट्रेलिया: रेशल हेनस, अलिसा हीली, मेग लन्निंग, बेथ मूने, तहिला मॅकग्राथ, एखले गार्डनर, अनाबेल सथरलँड, जेस जॉनासेन, एलाना किंग, मेगन स्कूट, डार्सी ब्राउन
वेस्ट इंडिज: डिएन्ड्रा डोट्टीन, हेले मॅथ्यू, स्टेफनी टेलर, शेमिनी कॅम्फेल, चेडीन नेशन, कासिया नाईट, चिनले हेन्री, एफी फ्लेचर, अलिया अलेन, अनिसा मोहम्मद, शकेरा सेलमन