Cameron Green reveals he has irreversible chronic kidney disease : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या साडेसहा फूट उंचीच्या अष्टपैलू खेळाडूने अशा अडचणींवर मात करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले, जिथे त्याच्या जगण्याची आशा नव्हती. कांगारू संघाचा सध्याचा स्टार खेळाडू कॅमेरून ग्रीन याने फक्त १२ वर्षे जगेल अशी डॉक्टरांची अपेक्षा नव्हती, पण कुटुंबाच्या मदतीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने सर्वांची चूकीचे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने खुलासा केला की, तो जन्माला आला तेव्हा त्याला ‘इरिव्हर्सिबल क्रॉनिक किडनी डिसीज’ने ग्रासले होते.

या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, एकेकाळी तो १२ वर्षांपेक्षा जास्त जगेल अशी अपेक्षा नव्हती. या आजाराची कोणतीही लक्षणे नसून किडनी बरी होऊ शकत नसल्याचे त्यानी सांगितले. चॅनल सेव्हनशी बोलताना ग्रीनने सांगितले, “जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या पालकांना सांगण्यात आले की मला अपरिवर्तनीय मूत्रपिंडाचा आजार आहे, ज्याची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु अल्ट्रासाऊंडद्वारे याबाबत माहिती झाले. क्रॉनिक किडनीचा आजार वाढतच राहतो. दुर्दैवाने, इतर लोकांच्या मूत्रपिंडांप्रमाणे माझी मूत्रपिंडे रक्त स्वच्छ करत नाहीत.”

हा २४ वर्षीय खेळाडू ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. ग्रीनने सांगितले की त्याच्या मूत्रपिंडाचे कार्य सध्या ६० टक्के आहे, जे दुसऱ्या टप्प्यात आहे आणि पाचव्या टप्प्यात प्रत्यारोपण किंवा डायलिसिस आवश्यक आहे. तो म्हणाला, “मी सध्या आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात आहे, पण तुम्ही योग्य काळजी घेतली नाही, तर ही पातळी आणखी खाली जाईल. मूत्रपिंड ठीक होऊ शकत नाही. त्यामुळे रोगाची वाढ कमी करण्याचे मार्ग तुम्ही शोधू शकता, तुम्ही प्रयत्न करत रहा.” गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यांच्या स्कॅन दरम्यान ग्रीनची आई टार्सी यांना हा आजार झाल्याचे निदान झाले. ग्रीनचे वडील गॅरी म्हणाले, “त्यावेळी याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यावेळी तो १२ वर्षांपेक्षा जास्त जगेल अशी अपेक्षा नव्हती.”

हेही वाचा – AUS vs PAK 1st Test : डेव्हिड वॉर्नरचे शतकी खेळीच्या जोरावर टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, पत्नीची पोस्ट होतेय व्हायरल

वेगवान गोलंदाज अष्टपैलू ग्रीनने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. त्यानंतर २४ कसोटी, २३ एकदिवसीय आणि आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो म्हणाला की या आजारामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरही परिणाम झाला आहे. कारण त्याला स्नायूंचा ताण अगदी सहज येतो. तो म्हणाला, “मला माझे मीठ आणि प्रथिनांचे प्रमाण कमी ठेवावे लागते, जे क्रिकेटपटू म्हणून आदर्श नाही, परंतु जेव्हा सामने असतात तेव्हा मी थोडे अधिक प्रथिने घेण्यास सुरुवात करतो. कारण मी मैदानावर खूप ऊर्जा खर्च करावी लागते. अशा प्रकारे तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याचे योग्य मार्ग शोधावे लागतात.”

Story img Loader