हॉकी इंडिया लीगशी करारबद्ध झालेल्या ९१ विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश सर्वाधिक आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या संघातील १६ खेळाडूंसह २४ ऑस्ट्रेलियन खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत.  पाकिस्तानतर्फे १५ खेळाडूंचा तर स्पेनच्या १० खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मातब्बर खेळाडूंच्या समावेशामुळे लीगमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळतील असा विश्वास हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी व्यक्त केला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते जर्मनी आणि रौप्यविजेते नेदरलँण्ड्स या संघांचेही खेळाडू सहभागी होणार असल्यामुळे समाधान असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.    

Story img Loader