Australian Cricketer Adam Zampa visited the Taj Mahal with his family: एकदिलवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहिला मिळत आहे. विश्वचषक स्पर्धेचे आयोजन देशातील वेगवेगळ्या सुंदर शहरात केले जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज ॲडम झाम्पाने आग्रा येथे पोहोचला आहे, जिथे त्याने ताजमहाल पाहिला आणि त्याच्या कुटुंबासोबत फोटोही काढले. ताजमहाल पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आणि ताजमहालची कारागिरी पाहून आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला की, मशीनशिवाय अशी रचना करणे खरोखर आश्चर्यकारक आहे.

ॲडम झाम्पाने पत्नी, आई आणि मुलासोबत ताजमहालला भेट दिली –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲडम झाम्पाने पत्नी, आई आणि मुलासोबत आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. भारतीय वेळेनुसार पहाटे ५.४५ वाजता ते आग्रा येथे पोहोचले. तथापि, ॲडम झाम्पा मुख्य थडग्यावरील लांबलचक रांगेमुळे वर जाऊ शकला नाही. म्हणूनच त्याने चमेली मजल्यावरूनच सुंदर इमारतीकडे पाहिले. यावेळी गाईडशी बोलताना ॲडम झाम्पा खूप उत्साही दिसला. ॲडम झाम्पा म्हणाला की, ऑस्ट्रेलिया नेहमीच अव्वल असतो, पण यावेळी भारतीय खेळपट्ट्या थोड्या वेगळ्या आहेत.

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Aruna Sabane asked harassed Priya Phuke is not beloved BJP sister
प्रिया फुके ही सरकारची ‘लाडकी बहीण ‘नाही आहे का? सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांचा सवाल

भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ॲडम झाम्पा म्हणाला की, भारतीय संघ विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या उपस्थित भारतीय संघाला हरवणे कठीण आहे. ॲडम झाम्पाने बॅटरी कारबाबत शिल्पग्राममध्ये नाराजी व्यक्त केली. बॅटरी कारमध्ये त्यांचा बसण्याचा क्रमांक होता, मात्र इतर पर्यटक त्यात बसले. यावर ॲडम झाम्पा संतापला आणि म्हणाला बॅटरी कारचा अभाव पर्यटकांसाठी अडचणीचा ठरत आहे.

हेही वाचा – PAK vs AFG: पाकिस्तानने अफगाणिस्तानला दिले २८३ धावांचे लक्ष्य, बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीकने झळकावले अर्धशतक

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नसेल, पण संघाने अप्रतिम पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर सध्या गुणतालिकेत ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हा संघ आपला पुढचा सामना २५ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. त्या सामन्यात कांगारू संघाचा वरचष्मा असणार आहे. कारण ते दोन सामने जिंकून परत येत आहे आणि ऑस्ट्रेलिया हा नेदरलँड्सपेक्षा बलाढ्य संघ आहे.