जलद माऱ्याने प्रतिस्पर्धी संघाला हैराण करणारा मिचेल जॉन्सन गेले काही काळ हरवलेला वाटत होता, परंतु लॉर्ड्सवरील अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पूर्वीचा जॉन्सन पाहायला मिळाला, असे मत ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले. जॉन्सनचा परतलेला फॉर्म ही इंग्लंडसाठी धोक्याची घंटा असल्याचेही मत व्यक्त केले.
लॉर्ड्सवर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडवर ४०५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरी ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १०३ धावांत गुंडाळण्यात जॉन्सनचा मोलाचा वाटा होता. त्याने २७ धावांमध्ये ३ बळी टिपले आणि चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच इंग्लंडला शरणागती मानण्यास भाग पाडले. जॉन्सनला गवसलेला सुरामुळे २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच विजय होईल, असे भाकीतही प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे. ‘‘ २०१३-१४ साली झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत जॉन्सनच्या गोलंदाजीने इंग्लंडला हैराण केले होते आणि तोच फॉर्म पुन्हा परतलेला दिसला,’’ असे वृत्त ऑस्ट्रेलियन्स गिडेऑन हेग यांनी छापले आहे. ‘‘गेल्या चार दिवसांत त्याने इंग्लंडवर नव्याने भीती निर्माण केली असल्याचेही या वृत्तात सांगण्यात आले आहे.

Story img Loader