भारतीय संघ ६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ६ ते १० डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी रविवारी भारतीय संघ अॅडलेडमध्ये दाखल झाले आहे. पाहुण्या संघाशी कायम माईंड गेम खेळणे हे ऑस्ट्रेलियन मीडिया आणि खेळाडूंचे आवडते काम आहे. त्यातच एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा फोटो प्रकाशित करून त्यावर ‘भित्री वटवाघळं’ असे शीर्षक दिले आहे.

अॅडलेड येथे दाखल होतानाचे फोटो BCCI ने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले होते. अॅडलेडमध्ये दाखल झाल्यानंतर स्थानिक भारतीय चाहत्यांनी भारतीय संघासोबत सेल्फी घेत त्यांचे स्वागत केले होते. पण ऑस्ट्रेलियातील एका आघाडीच्या वृत्तपत्राने मात्र अशाप्रकारचे कृत्य करून टीम इंडियाच्या खेळाडूना हिणवले आहे.

दरम्यान, या प्रकारच्या वृत्ताचा ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी आणि इतर नागरिकांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

===

Story img Loader