Novak Djokovic, Australian Open 2023 Champion: गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. सर्बियाच्या टेनिस स्टारने वर्षभरानंतर शानदार पुनरागमन करत विक्रमी १०व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. रविवारी खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने ग्रीक खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
जोकोविचने त्सित्सिपासला संधी दिली नाही
जोकोविचने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ असा घेतला. यानंतर त्सित्सिपासने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले पण जोकोविचने दुसरा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ अशा फरकाने जिंकला. तिसर्या सेटमध्येही दोन्ही खेळाडू ६-६ ने बरोबरीत होते, त्यानंतर जोकोविचने टायब्रेकरमध्ये ७-५ असा विजय मिळवला आणि दहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.
राफेल नदालशी बरोबरी केली
या विजेतेपदासह ३५ वर्षीय जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालची बरोबरी केली आहे. दोघांच्या खात्यात आता २२-२२ जेतेपदे आहेत. निवृत्त रॉजर फेडरर २० ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जोकोविचच्या २२ विजेतेपदांमध्ये १० ऑस्ट्रेलियन ओपन, २ फ्रेंच ओपन, ७ विम्बल्डन आणि ३ यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.
जोकोविचनने अनेक विक्रम केले
पुरुष एकेरीची सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू
२२- नोव्हाक जोकोविच
२२- राफेल नदाल
२०- रॉजर फेडरर
१४- पीट सॅंम्प्रास
सर्वाधिक एकेरी विजेतेपद मिळवणारे महिला व पुरुष खेळाडू
२३- सेरेना विलियम्स
२२- स्टेफी ग्राफ
२२- नोव्हाक जोकोविच
२२- राफेल नदाल
२०- रॉजर फेडरर
१८- ख्रिस इवर्ट
१८- मार्टिना नवरातिलोवा
१४- पीट सॅंम्प्रास
नोव्हाक जोकोविच जगातील दुसरा असा खेळाडू झाला ज्याने १५ वर्षात दोन वेळा एखादी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचने २००८ साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. तर त्यानंतर २०२३मध्ये पुन्हा ही स्पर्धा जिंकली. यापुर्वी स्पेनच्या राफेल नदालने २००५साली फ्रेंच ओपन जिंकली होती. त्यानंतर २०२२मध्ये फ्रेंच ओपन जिंकली.
एकच स्पर्धेत सर्वाधिक वेळा जिंकणारे खेळाडू
१४- राफेल नदाल, फ्रेंच ओपन
१०- नोव्हाक जोकोविच, ऑस्ट्रेलियन ओपन
८- रॉजर फेडरर, विंबल्डन
८- पीट सॅंम्प्रास, विंबल्डन
७- नोव्हाक जोकोविच, विंबल्डन
विजयानंतर जोकोविच ढसाढसा रडला
विजेतेपद पटकावल्यानंतर नोव्हाक जोकोविच त्याच्या टीम आणि कुटुंबियांसोबत स्टँडवर पोहोचला आणि ढसाढसा रडू लागला. गेल्या वेळी या स्पर्धेत सहभागी होऊ न शकल्यामुळे त्याला कोणत्या वेदना सहन कराव्या लागल्या आणि यावेळी पुनरागमन करताना त्याला मनापासून हे विजेतेपद मिळवायचे होते हे यावरून स्पष्ट होते.